रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलने भारतातील प्रमुख शहरांमध्ये आता 5G नेटवर्क द्यायला सुरुवात केली आहे. पण आता बरेच स्मार्टफोन युजर्स तक्रार करतायत की त्यांच्या स्मार्टफोनला 5G नेटवर्क नाहीये पण त्यांच्या शहरात मात्र 5G नेटवर्क आलंय. जर तुमच्या स्मार्टफोनला 5G सर्व्हिस मिळत नसेल तर तुम्हाला फोनच्या सेटिंगमध्ये काही बदल करावे लागतील.
1. सर्वप्रथम, तुम्हाला फोनच्या सेटिंग्ज ऑप्शन वर क्लिक करावं लागेल.
2. यानंतर तुम्हाला वाय-फाय आणि नेटवर्क या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
3. त्यानंतर युजर्सना सिम आणि नेटवर्क या ऑप्शनवर क्लिक करावं लागेल.
4. यानंतर तुम्हाला सर्व टेक्नॉलॉजी लिस्ट दिसेल.
5. यामध्ये तुम्हाला शेवटी Preferred Network Type हा पर्याय दिसेल.
6. तुमच्या फोनमध्ये 5G सपोर्ट असेल, तर तो 2G, 3G, 4G आणि 5G सपोर्ट दाखवेल.
7. यातून तुम्हाला 5G नेटवर्क हा पर्याय निवडावा लागेल.
Jio आणि Airtel ने 5G सर्व्हिस सुरू केलीय.
रिलायन्स जिओने 4 शहरांमध्ये 5G ची सर्व्हिस सुरू केली आहे. कोलकाता, दिल्ली, मुंबई आणि वाराणसी मध्ये सध्या ही सेवा सुरू करण्यात आली आहे.दुसरीकडे भारती एअरटेलने 8 शहरांमध्ये 5G सेवा सुरू केलीय. यामध्ये दिल्ली, वाराणसी, नागपूर, बंगळुरू, हैदराबाद, मुंबई, चेन्नई आणि सिलीगुडी या शहरांचा समावेश आहे.
तसेच 2024 पर्यंत 5G सर्व्हिस संपूर्ण देशभरातील महत्वाच्या शहरांमध्ये आणली जाईल असं एअरटेलने स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे जिओने 2023 पर्यंत संपूर्ण देशभरात 5G सेवा देण्याचा दावा केलाय.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.