औरंगाबाद : टेक्नोने स्पार्क ८ स्मार्टफोन भारतीय बाजारात सादर केला आहे. यापूर्वी हा फोन ऑगस्ट महिन्यात नायजेरियात लाँन्च करण्यात आला होता. हा स्मार्टफोन टेक्नो स्पार्क ७ चा अपग्रेड माॅडेल आहे. कंपनीने या अद्ययावत फोनमध्ये चांगला रिअर कॅमेरा आणि सर्वोत्तम डिझाईन देऊ केले आहे.
टेक्नो स्पार्क ८ ची किंमत
- टेक्नो स्पार्क ८ स्मार्टफोनची भारतात ७ हजार ९९९ रुपये अशी किंमत आहे. हा फोन आयरिस पर्पल, अटलांटिक ब्ल्यू आणि टरकिस सियान या तीन रंगात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनच्या विक्रीला उद्यापासून (१५ सप्टेंबर) सुरुवात होणार आहे.
वैशिष्ट्ये
- टेक्नो स्पार्क ८ मध्ये ६.५२ इंचाचा आयपीएस डिस्प्ले आहे. तो टिअरड्राॅप नाॅचबरोबर येतो. ते डिस्प्ले एचडी प्लस रेझोल्यूशनबरोबर येते. त्याचे रेझोल्यूशन ७२० बाय १६०० पिक्सल आहे. तसेच त्याचा आस्पेक्ट रेशो २० : ९ आहे. या फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ A२५ चिपसेटचा वापरला गेला आहे.
फिचर्स
- या स्मार्टफोनमध्ये २ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आला आहे. हा फोन अँड्राॅईड ११ (गो एडिशन) वर काम करतो. सोबतच यात Hios 7.6 UI देण्यात आला आहे. जे सुपर बुस्ट सिस्टिम ऑप्टिमायझेशनबरोबर येते.
कॅमेरा
- टेक्नो स्पार्क ८ मध्ये ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे, जे f/2.0 अपर्चर बरोबर येते. बॅक पॅनलवर ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. त्यात प्रायमरी कॅमेरा १६ मेगापिक्सलचा, तर दुसरा कॅमेरा AI लेन्स आहे. यात एलईडी फ्लॅश लाईटचीही सुविधा आहे.
या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर आहे. त्याने लाॅक फोन अनलाॅक केला जातो. तसेच ड्युअल सिम सपोर्ट आहे. तो 4 G VoLTE, Wi-Fi आणि ३.५ मीमीच्या जॅकबरोबर काम करतो. यात एसडी कार्डच्या सपोर्टसाठीही स्लाॅट देण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.