तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये अलिकडे अनेक कामांसाठी लॅपटॉपचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. अगदी शालेय विद्यार्थी असो किंवा कॉलेज तरुण तसचं कार्यालयांमध्ये लॅपटॉप Laptop ही गरजेची वस्तू बनली आहे. दररोजच्या असाइंमेंट असो किंवा ऑफिसची Office कामं लॅपटॉपवर मोठा भार पडत असतो. अनेकदा लॅपटॉपमधील काही गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करतो ज्यामुळे लॅपटॉप स्लो होते. Technology Tips Marathi Know how to increase speed of your Laptop
लॅपटॉप स्लो Laptop Speed झाल्याने अनेकदा महत्वाच्या कामांमध्ये Work अडचणी निर्माण होतात. मात्र जर तुम्ही थोडा वेळ काढूल लॅपटॉपमधील काही गोष्टींकडे लक्ष दिलंत तर तुमचा लॅपटॉप सुपरफास्ट चालू शकतो आणि चांगला परफॉर्मन्सही देऊ शकतो.
लॅपटॉप वापरत असतानाच त्याच्या मेंटेनंसकडे लक्ष देणं तितकच गरजेचं आहे. अनेकजण केवळ रोजची कामं झाली की लॅपटॉप बंद करून ठेवतात. परिणामी लॅपटॉप स्लो होणं किंवा हँग होणं अनेकदा एखादा मोठा बिघाड होणं अशा समस्या निर्माण होवू शकतात. म्हणूनच लॅपटॉप वापरत असताना काही सामान्य गोष्टींची नियमित काळजी घेणं गरजेचं आहे.
ब्राऊजर टॅब बंद करा- अनेकदा आपण एकाचवेळी अनेक टॅब सुरू ठेवतो. एकाच वेळी अनेक टॅब सुरू राहिल्याने लॅपटॉपच्या रॅम आणि प्रोसेसरवर लोड येतो. यामुळे अनेकदा लॅपटॉप स्लो किंवा हँग होवू शकतो. यासाठीच ज्या टॅबमधील काम झालं असेल किंवा जे कामाचे नाहीत असे टॅब बंद करा.
हे देखिल वाचा-
बॅकग्राउंड प्रोग्राम- जेव्हा तुम्ही लॅपटॉपवर काम करत असतात तेव्हा बॅकग्राउंडला अनेक प्रोग्राम सुरु असतात. यामुळे लॅपटॉपवर लोड येत असतो. यासाठीच यातील तुम्ही वापरत नसलेले प्रोग्राम डिलीट करणं गरजेचं आहे. हे प्रोग्राम डिलीट केल्यास तुमच्या लॅपटॉपचा स्पीड वाढेल. काही वेळा या प्रोग्राम्समुळे लॅपटॉप अधिक गरम देखील होतो.
लॅपटॉपमधील नको असलेले प्रोग्राम किंवा अप्स डिलीट करण्यासाठी सर्च ऑप्शनमधून कंट्रोल पॅनलमध्ये जा. इथं programs and features हा पर्याय निवडा. इथं तुमच्य़ा लॅपटॉपमध्ये असलेले सर्व प्रोग्राम दिसतील. यातून तुम्ही जे प्रोग्रॅम वापरत नसाल ते डिलीट करा. यामुळे लॅपटॉप फास्ट होण्यास मदत होईल.
रिसायकल बिन करा क्लियर- अनेकदा आपण वरचेवर डाउनलोड केलेल्या किंवा ऑटोडाउनलोड झालेल्या अनेक फाइल डिलीट करतो. किंवा प्रोग्राम फाइल डिलीट करतो मात्र या फाइल्स रिसायकल बिनमध्ये तशाच असतात. या फाइल लॅपटॉपच्या मेमरीची बरीच स्पेस घेतात. यामुळेही लॅपटॉवर लोड येऊ शकतो. यासाठीच नियमितपणे रिसायकल बिन डिलीट करण्याची सवय ठेवा.
टेंपररी फायईल डिलीट करा- लॅपटॉपवर काम करत असताना आपण वेगवेगळ्या सॉफ्टवेअर किंवा ब्राउझरचा वापर करत असतो. यावेळी अनेक Temporary Files एका फोल्डवर जमा होतात. हे फोल्डर हार्ड डिस्कवर स्टोर होत असतात. या फाइल्स साचत गेल्याने लॅपटॉप स्लो होतो.
या Temporary Files डिलीट करणं गरजेचं असंत. या फाईल डिलीट करण्यासाठी काही सोप्या स्टेप्स आहेत.
‘Window + R एकत्रित प्रेस करा.
यानंतर Run चा पर्याय दिसेल. यामध्ये %Temp% टाईप करून ओके क्लिक करा.
यानंतर तुमच्या समोर फाईल्सची एक लिस्ट ओपन होईल. या सर्व फाईल सिलेक्ट करून Delete करा.
यानंतर पुन्हा एकदा Window + R ने रनचा पर्याय सुरु करा. आता इथे केवळ Temp टाइप करून ओके वर क्लिक करा.
पुन्हा एकदा काही फाइल्सची लिस्ट तुम्हाला दिसेल. या सर्व फाइल डिलीट करा.
अशा प्रकारे तुमच्या सर्व Temporary Files डिलीट होतील. रिसायकल बिन देखील क्लियर करा. यानंतर तुमचा टॅपटॉप पुन्हा फास्ट चालू लागेल.
हे देखिल वाचा-
C ड्राइव्ह क्लीन ठेवणं- तुमच्या लॅपटॉपमधील C Drive कायम फ्री असेल याची काळजी घ्या. अनेकदा या सी ड्राइव्हमध्ये बिनाकामाच्या फाइल्स स्टोर होत असतात. याचा परिणाम लॅपटॉपच्या स्पीडवर होत असतो. यामुळे अनेकदा सिस्टम हँग होवू लागते.
C Drive क्लीन करण्यासाठी सी ड्राइवर Right Click करून Propertiesमध्ये जा.
इथं General Tap वर क्लिक करा.
त्यानंतर उजव्या बाजूला खाली Disk Cleanup हा पर्याय दिसेल यावर क्लिक करा.
थोडा वेळ प्रोसेस झाल्यानंतर तुमच्या समोर फाईल शोचा पर्याय येईल. Ok वर क्लिक केल्यानंतर C Drive क्लीन होईल.
अशा प्रकारे Laptop वापरत असताना त्यातील नको असलेल्या फाइल, ऍप्स तसचं प्रोग्राम डिलीट करणं गरजेचं आहे. सोबतच ब्राइजिंग हिस्ट्री, कॅचे आणि कुकिज क्लिकर करणंही गरजेचं आहे. यामुळे तुमचा लॅपटॉप सुरळीत आणि फास्ट चालेल.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.