Technology Tips : दुष्काळात तेरावा महिना! गुगलने कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर आता प्रमोशन थांबवले

आता तर गुगलने कर्मचाऱ्यांना थेट इशारा दिला
Technology Tips
Technology Tips esakal
Updated on

Technology Tips : जागतिक आर्थिक मंदीला (Recession) केंद्रस्थानी ठेवत 2022 या वर्षापासूनच अनेक संस्थांनी मोठ्या संख्येनं कर्मचारी कपात करण्याचा निर्णय घेतला आणि त्याची अंमलबजावणी देखील केली. Amazon, Twitter यांसारख्या मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना नारळ दिला. यात आता आणखी एका जगप्रसिद्ध कंपनीचा समावेश होता. ही कंपनी म्हणजे गुगल.

Technology Tips
Technology Tips : Alexa आणि Google Home तुमचं 'सिक्रेट' रेकॉर्ड करू शकतात, असा डिलिट करा डेटा

आता तर गुगलने कर्मचाऱ्यांना थेट इशारा दिलाय की, या वर्षी वरिष्ठ पातळीवर इतर वर्षांच्या तुलनेत कमी प्रमोशन होतील. याआधी जानेवारीमध्ये Google ची मूळ कंपनी Alphabet Inc ने सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकले होते. CNBC च्या रिपोर्टनुसार, कंपनीने 27 फेब्रुवारीला आपल्या कर्मचाऱ्यांना या संदर्भात एक ईमेल पाठवला होता.

Technology Tips
Technology Tips : Ola-Ather ला घाम फुटला, हिरो घेऊन येणार इलेक्ट्रिक स्कूटरची नवी रेंज

रिपोर्टनुसार, या ईमेलमध्ये असं म्हटलंय की ही प्रोसेस मॅनेजर अंडर असेल. शिवाय संथ गतीने सुरू असलेल्या नियुक्त्या आणि L6 आणि त्यावरील प्रमोशन कमी करण्याची योजना सुरू आहे. गुगलची आधीची ग्रोथ बघता आता हे प्रमोशन कमी करावे लागणार आहेत. Google मध्ये, L-6 हा कर्मचाऱ्यांची पहिली स्टेज आहे. हे कर्मचारी वरिष्ठ मानले जातात आणि त्यांना 10 वर्षे किंवा त्याहून अधिक कालावधीचा अनुभव असतो.

Technology Tips
WhatsApp Tips : तुमचं व्हॉट्सअॅप कोणी चोरून पाहतंय का? चुकूनही करू नका या 2 गोष्टी

या वर्षी प्रमोशन कमी होतील?

दिग्गज टेक कंपनीच्या म्हणण्यानुसार, नेतृत्वाच्या भूमिकेतील कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ कंपनीच्या वाढीच्या प्रमाणात व्हावी म्हणून हे पाऊल उचललं जात आहे. कर्मचार्‍यांना पाठवण्यात आलेल्या ईमेलमध्ये असं म्हटलंय की, जर तुमच्या व्यवस्थापकाला वाटतं की तुम्ही प्रमोशनसाठी तयार आहात तरच तुम्हाला नॉमिनेशन मिळेल.

Technology Tips
Tiago, Tigor, Safari : स्वस्तात खरेदी करा टाटा कार्स, 65000 पर्यंत सूट

याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी स्वत: चं नाव पुढे करायचं आहे त्यांनी 6 मार्च ते 8 मार्च या कालावधीत आपले अर्ज पाठवावेत. याशिवाय कंपनीच्या चायना विभागाने अलीकडेच कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे. रिपोर्ट्सनुसार, गुगलच्या चायना ऑफिसमध्ये कर्मचारी कपातीची सध्याची फेरी पगार रीसेट करण्यासाठी आहे. याशिवाय, एकूण कामाची कार्यक्षमता सुधारण्याचा आणि ऑपरेटिंग खर्च कमी करण्याचा प्रयत्न आहे.

Technology Tips
Jio 5G : या नव्या शहरात Jio ची 5G सेवा सुरू, तुमच्या शहराचा समावेश आहे का?

गुगल चायना ऑफिसमधील कर्मचारी कपातीचा फटका सर्वाधिक पगार असलेल्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांना बसेल. रिपोर्टनुसार, या कर्मचाऱ्यांना एका महिन्याचा पगार, रजा सवलत असे मिळून 3.5 लाख रोख आणि वैद्यकीय विमा मिळेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.