Technology Tips : भूकंप, महापूर आणि त्सुनामीपूर्वी फोनवर मिळणार अलर्ट, या तंत्रज्ञानामुळे वाचणार जीव

भारताला नैसर्गिक आपत्ती नव्या नाहीत
Technology Tips
Technology Tips esakal
Updated on

Technology Tips : भारताला नैसर्गिक आपत्ती नव्या नाहीत. भारताच्या भौगोलिक रचनेमुळे बऱ्याचदा भारताला निरनिराळ्या नैसर्गिक विपदांचा सामना करावा लागत असतो. भारताचे ह्या नैसर्गिक आपत्तीमुळे मोठया प्रमाणात नुकसान होत असते. मोठ्या प्रमाणात जीवित तसेच वित्त हानी होत असते.

Technology Tips
Technology News : Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी TVS घेऊन येत आहे नवीन बाईक, इंजिन असेल मजबूत

नैसर्गिक आपत्ती वेगवेगळ्या स्वरूपाच्या असतात, कधी भूकंप , कधी त्सुनामी, कधी महापूर, कधी चक्रीवादळ तर कधी भीषण दुष्काळ. या नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी जीवितहानी ही प्रचंड असते. अनेक लोक आपला जीव गमावतात.

Technology Tips
Technology News : Royal Enfield ला टक्कर देण्यासाठी TVS घेऊन येत आहे नवीन बाईक, इंजिन असेल मजबूत

अशा वेळी आपल्या मनात पहिला विचार येतो की, अशा आकस्मिक संकटांची आधीच कल्पना असती, तर कदाचित इतक्या लोकांचे प्राण वाचू शकले असते. मोबाईल युजर्सना भूकंप, पूर आणि त्सुनामी यांसारख्या आपत्तीची पूर्वसूचना सायरन किंवा अलर्टद्वारे मिळाली असती तर किती बरं झालं असतं. पण हे शक्य आहे. विश्वास बसत नाही का?

Technology Tips
Technology News : गुगल आणि मेटाचे हजारो कर्मचारी काम न करता पगार घेत होते

तर ब्रिटनच्या सरकारने आपल्या नागरिकांसाठी नवीन आपत्कालीन अलर्ट सेवा सुरू करण्याची घोषणा केली आहे. अशा परिस्थितीत पुढील महिन्यात संपूर्ण ब्रिटनमधील मोबाईल फोन युजर्सना सायरनसारखा अलर्ट पाठवला जाईल, असं सरकारने जाहीर केलंय.

Technology Tips
Technology Tips : दुष्काळात तेरावा महिना! गुगलने कर्मचाऱ्यांची कपात केल्यानंतर आता प्रमोशन थांबवले

भूकंप, पूर, त्सुनामी आणि जंगलातील आग यासारख्या प्राणघातक घटना टाळण्यासाठी लोकल अलर्ट सिस्टीम चाचणीचा हा एक भाग असेल. रविवार 23 एप्रिल रोजी संध्याकाळी यूके वाइड अलर्ट टेस्ट केली जाईल. या टेस्ट मध्ये मोबाईल फोन युजर्सना एक मॅसेज मिळेल.

Technology Tips
Dental Health : दात घासताना 'या' चुका आवर्जून टाळा

या नव्या इमर्जन्सी अलर्ट फक्त त्या भागात वापरला जाईल जिथे मोठ्या प्रमाणावर लोकांच्या जीवाला धोका असेल. अशा स्थितीत लोकांना महिनोमहिने किंवा वर्षानुवर्षे कोणताही इशारा मिळणार नाही अशी शक्यता आहे. घटनांच्या लिस्टमध्ये दहशतवादी हल्ला झाल्यास इशाराही जोडला जाण्याची शक्यता आहे.

Technology Tips
World Oral Health Day 2023 : 'या' पाच कारणांनी येतो तोंडाचा वास, जाणून घ्या एका क्लिकवर

हे इमर्जन्सी अलर्ट इंग्लंड, स्कॉटलंड, वेल्स आणि नॉर्दर्न आयर्लंडमध्ये वापरले जातील. आणि इंग्लंडमधील गंभीर पूर यांसह सर्वात गंभीर हवामान-संबंधित घटनांवर लक्ष केंद्रित करून लोकांना आधीच सावध करेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.