TRAI New Update : दोन सिम कार्ड वापरणाऱ्यांना द्यावे लागणार अतिरिक्त शुल्क? TRAI ने काय सांगितलं,जाणून घ्या

Two SIM Penalty : दोन सिमकार्डवर दंड आणि जास्त शुल्क आकारण्याचा रिपोर्टवर TRAI ने तोडले मौन,ट्विट करून दिली माहिती
Telecom Authority Clears About Dual SIM Fine Claims
Telecom Authority Clears About Dual SIM Fine Claimsesakal
Updated on

TRAI : नुकताच एका अहवालात असा दावा करण्यात आला होता की सरकार एका फोनमध्ये दोन सिम कार्ड वापरणाऱ्यांवर अतिरिक्त शुल्क आकारण्याचा विचार करत आहे. यामुळे अनेक नागरिकांमध्ये चिंता निर्माण झाली होती. परंतु आता दूरसंचार विभागाने या दाव्यांचे स्पष्टीकरण देत ट्विटरवर पोस्ट केले आहे.

दूरसंचार विभागाने म्हटले आहे की ट्राय ग्राहकांकडून एकापेक्षा जास्त सिम किंवा नंबरसाठी शुल्क आकारण्याची योजना आखत नाही. हे दावे निराधार आहेत आणि जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे.

Telecom Authority Clears About Dual SIM Fine Claims
Driverless Metro : 'या' शहरात धावणार देशातील पहिली ड्रॉयव्हरलेस मेट्रो; जाणून घ्या 'टारझन'ची खासियत

अलीकडेच, एका वृत्त अहवालात म्हटले होते की टेलिकॉम रेग्युलेटर ट्रायने (TRAI) एका प्रस्तावात दोन सिम कार्ड वापरणाऱ्यांवर दंड आकारण्याची शिफारस केली आहे. हा निर्णय नंबरचा गैरवापर रोखण्यासाठी घेतला जाऊ शकतो, असे म्हटले होते.

तरी, दूरसंचार विभागाने या प्रस्तावाचे खंडन केले आहे आणि असे म्हटले आहे की सरकारने अशा कोणत्याही प्रस्तावाला मान्यता दिलेली नाही.

यामुळे नागरिकांना थोडा दिलासा मिळाला आहे. जर तुमच्याकडेही दोन सिमकार्ड असतील तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. सरकारने अद्यापपर्यंत दोन सिमकार्ड वापरण्यावर कोणतेही निर्बंध किंवा अतिरिक्त शुल्क लादलेले नाहीत.

Telecom Authority Clears About Dual SIM Fine Claims
Wiper Rainy Glasses: पावसात लाँग ड्राईव्हला जायचा प्लॅन करताय? डोळ्यांना कसलाच त्रास होऊ न देणारा स्पेशल चष्मा ट्राय कराच

तरीही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की सरकार भविष्यात याबाबत काय निर्णय घेते हे सांगणे कठीण आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीसाठी सरकारी वेबसाइट्स आणि बातम्यांचे स्त्रोत पाहिले पाहिजेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.