Telegram चे खास फीचर्स जे WhatsApp वर देखील नाहीत, जाणून घ्या सविस्तर

 telegram app
telegram app Google
Updated on

व्हॉट्सअ‍ॅप हे जगात सर्वाधिक वापरले जाणारे इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. पण त्यामध्ये बऱ्याच फीचर्सवर मर्यादा आहेत. मात्र, टेलिग्राम या फ्री इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म वर वापरकर्त्यांना व्हॉट्सअ‍ॅप पेक्षा अनेक खास फीचर्स मिळतात. तसेच टेलिग्राममध्ये वापरकर्त्यांच्या डेटा सुरक्षिततेची विशेष काळजी देखील घेतली जाते. आज आपण अशाच काही खास फिचर्सबद्दल जाणून घेणार आहोत जे या प्लॅटफॉर्मला इतरांपेक्षा वेगळं आणि खास बनवतात.

तुम्हाला टेलिग्राममध्ये ओपन-सोर्स, क्रॉस-प्लॅटफॉर्म सेवा एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड व्हिडिओ कॉलिंग, VoiIP, फाइल शेअरिंग सारखी फीचर्स वापरकर्त्यांना या प्लॅटफॉर्मवर मिळतात. याव्यतिरिक्त, प्लॅटफॉर्म ऑप्शन एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड सिक्रेट चॅटचा (secret chat) ऑप्शन देखील देण्यात आलेला आहे. अँड्रॉइडसाठी टेलिग्राम अ‍ॅपचे गुगल प्ले स्टोअरवर 500 मिलीयनहून अधिक डाउनलोड आहेत.

1. पाठवलेला संदेश एडीट करा

टेलीग्राम वर तुम्ही आधीच पाठवलेला मॅसेज देखील एडीट करु शकता. त्यासाठी तुम्ही पाठवलेला संदेश निवडा आणि वरच्या बाजूला असलेल्या एडीट करा (पेन) चिन्हावर टॅप करा. तुम्ही बदल केल्यानंतर अ‍ॅप तुम्हाला ए़डिट लेबल दाखवेल. हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की, आपण संदेश पाठवल्यानंतर 48 तासांनंतरच तो मॅसेज एडिट करता येतो.

2. सायलेंट मॅसेज

जर तुम्ही ज्या वापरकर्त्याला संदेश पाठवायचा असेल आणि ती व्यक्ती दुसऱ्या कामातव्यस्त असेल, आणि तरीही तुम्हाला त्यांना त्रास न देता संदेश पाठवायचा असेल, तर तुम्ही सायलेंट मॅसेज फीचरचा वापर करून तो मॅसेज पाठवू शकता. हे फीचर वापरून मेसेज पाठवताना, रिसीव्हरने 'डू नॉट डिस्टर्ब मोड' चालू केला नसला तरीही आवाज किंवा व्हायब्रेशनन करता संदेश पाठवला जातो हे फीचर वापरण्यासाठी, आपला संदेश टाइप करा आणि नंतर सेंड बटण दाबून धरून ठेवा. त्यानंतर तुम्ही “Send without sound” हा पर्याय निवडू शकता.

3. शेड्यूल मॅसेज

आपण टेलीग्रामवर आपले संदेश शेड्यूल देखील करू शकता. आपण फक्त सेंड बटण प्रेस करुन संदेश शेड्यूल करू शकता.यासाठी ,“Schedule message” हा पर्याय निवडा आणि तारीख आणि वेळ निवडा. तुम्ही निवडलेल्या वेळी मेसेज पाठवला जाईल

4. चॅट सेल्फ डिस्ट्रक्ट करा

टेलिग्राम अ‍ॅप तुम्हाला मिडीया फाइल तुम्ही ठरवलेल्या वेळी डिस्ट्रक्ट करता येते . हे फीचर पूर्वी फक्त "सिक्रेट चॅट" यासाठी मर्यादित होते. अलीकडील नवीन अपडेटमध्ये सामान्य चॅट मध्ये देखील आपण फोटो आणि व्हिडिओ सारख्या मिडीया फाइल्स सेल्फ डिस्ट्रक्ट करू शकता. त्यासाठी फोटो किंवा व्हिडिओ निवडा आणि नंतर ते चालू करण्यासाठी "टाइमर" बटण टॅप करा. त्यानंतर तुम्ही वेळ निवडू शकता ज्या वेळेला मीडिया आपोआप डिलीट केला जाईल.

 telegram app
MG Gloster Savvy 7-सीटर व्हेरियंट भारतात लॉंच, जाणून घ्या डिटेल्स

5. पाठवलेले मेसेज डिलीट करा

टेलिग्राम वापरताना, आपण अॅपवर पाठवलेले संदेश डिलीट करु शकता आणि इतर वापरकर्त्यांनी पाठवलेले संदेश देखील डिलीट करता येतात. हे विशेष फिचर वापरण्यासाठी, तुम्हाला आलेला मेसेज निवडा आणि डिलीट बटण टॅप करा. त्यानंतर तुम्ही “Also delete for X” हा पर्याय देखील निवडू शकता आणि डिलीट वर टॅप करू शकता. संदेश दोन्ही ठिकाणहून गायब होईल.

6. व्हिडिओ एडीट करा

आपण टेलीग्राम वर व्हिडिओ एडीट करू शकता. हे फीचर वापरण्यासाठी, एक चॅट उघडा आणि आपण पाठवू इच्छित असलेला व्हिडिओ निवडा. व्हिडिओ संपादक उघडण्यासाठी ट्यूनिंग चिन्हावर टॅप करा. तुम्ही सॅच्युरेशन, कॉन्ट्रास्ट, एक्सपोजर आणि बरेच एलिमेंट्स एडजेस्ट करू शकता.

7. जलद GIF आणि YouTube सर्च

जर तुम्हाला टेलिग्राम अ‍ॅप बंद न करता GIF किंवा YouTube लिंक पाठवायची असेल तर तुम्ही ते करू शकता. @gif किंवा @youtube टाइप करा आणि तुम्हाला काय सर्च करायचे आहे ते टाइप करा. तुमच्या चॅट स्क्रिनवर रिजल्ट्स दिसतील.

 telegram app
रिव्हर्स गिअर असलेली स्कूटर लवकरच बाजारात; चालते इलेक्ट्रिकवर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.