टेलिग्राम हा भारातात मोठ्या प्रमाणात वापरला जाणारा मॅसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. विशेषतः स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी याचा वापर स्टडी मटेरीयल शेअर करण्यासाठी करतात. तसेच टेलिग्रामच्या माध्यमातून बरेचसे ऑनलाइन कोर्सेस, क्लासेसचे सब्स्क्रिप्शन्स देखील हे विद्यार्थी विकत घेतात. ग्रामिण भागात राहाणारे विद्यार्थी तसेच घरी राहून स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करणाऱ्या गृहणी यांच्यासाठी टेलिग्राम हा खूप महत्वाचा विषय आहे.
पण आता या टेलिग्राम वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. करण टेलिग्राम हा मेसेजिंग प्लॅटफॉर्म भारतात लवकरच बंद होण्याची शक्यता आहे. पण याचं नेमकं कारण काय? हे आपण जाणून घेणार आहोत.