Telegram ला मिळाले आणखी नवीन फीचर्स; चॅटिंग होणार आणखी मजेशीर

 telegram app
telegram app Google
Updated on

Telegram New Update : इन्स्टंट मेसेजिंग अॅप टेलीग्राम (Telegram) जगभरातील लाखो लोक वापरतात. हे वापरण्यास अतिशय सोपे असल्यामुळेच या App चा वापर करणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. टेलिग्राम सतत नवनवीन फीचर्स आपल्या यूजर्ससाठी घेऊन येत आहे. आता देण्यात आलेले हे नवीन फीचर्स किंवा अपडेटमुळे WhatsApp टेलिग्रामच्या खूप मागे पडले आहे. दरम्यान टेलीग्रामचे नवीन अपडेट अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही ऑपरेटिंग सिस्टिमसाठी जारी करण्यात आले आहे.

या अपडेटचा भाग म्हणून, कंपनीने नवीन व्हिडिओ स्टिकर्स, चॅट मध्ये सुधारित नेव्हिगेशन, एनहांस मेसेज रिएक्शन आणि अनसीन रिएक्शन पाहण्यासाठी एक बटण दिले आहे. टेलिग्रामवर आधीपासूनच अशी अनेक फीचर्स आहेत, ज्यामुळे ते whatsApp पेक्षाही खास ठरते. त्याच वेळी, या लेटेस्ट अपडेटनंतर, व्हिडिओ स्टिकर्सचा सपोर्ट देखील व्हॉट्सअॅपच्या आधी देण्यात आले आहे.

 telegram app
रेल्वे स्टेशनची नावे पिवळ्या बोर्डवरच का लिहीतात? जाणून घ्या खास कारण

नवीन अपडेटनुसार, आता तुम्ही रेग्युलर व्हिडिओवरही स्टिकर्स सपोर्ट देऊ शकाल. याच्या मदतीने कोणीलाही व्हिडिओ एडिटिंग प्रोग्रामद्वारे अॅनिमेटेड स्टिकर्स सहजपणे तयार करता येतील. तसेच तुम्ही तुमचा पॅक @Stickers bot वरून पब्लिश करू शकता किंवा तुम्ही इतरांनी तयार केलेले सेट देखील यामध्ये जोडू शकता.

टेलिग्रामने शेवटच्या अपडेटमध्ये इमोजी रिएक्शन फीचर लॉंच केले होते. याच्या मदतीने तुम्ही कोणत्याही मेसेजवर इमोजीद्वारे प्रतिक्रिया देऊ शकता. तसेच हे फीचर आणखी सुधारित केले गेले आहे, ज्यामध्ये अधिक कॉम्पॅक्ट अॅनिमेशन आणि अनसीन रिएक्शनसाठी हार्ट बटण दिले जात आहे. यासह, आपण कोणत्याही रिएक्शनवर प्रेस आणि होल्ड करुन त्याला मोठा इफेक्ट देखील देऊ शकता. यासोबतच कंपनीने पाच नवीन रिएक्शन दिल्या आहेत.या रिएक्शन इमोजी म्हणून देखील पाठवल्या जाऊ शकतात.

अलीकडील चॅटवर नेव्हिगेट करणे आता सोपे झाले आहे. हे फीचर खूपच भन्नाट असून कंपनीने न वाचलेल्या चॅनेल दरम्यान नेव्हिगेट करण्यासाठी शॉर्टकट दिला आहे. याशिवाय, कंपनीने सुधारित कॉल गुणवत्ता, इंस्टंट पेज व्ह्यूसाठी ट्रांसलेशन यांसारखे फीचर्स देखील दिले आहेत.

 telegram app
एअरटेलचा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन! मिळतो 3GB डेटा अन् फ्री कॉलिंग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()