Tesla Car : टेस्लामधील त्रुटींमुळे कार हॅक होण्याची शक्यता

सिक्योरिटी रिसचर्सना अलीकडेच टेस्ला कारमधील एक नव्हे तर तीन प्रमुख त्रुटींबद्दल माहिती
Tesla Car
Tesla Caresakal
Updated on

Tesla Car : एखाद्याचा मोबाईल फोन हॅक झाल्याबद्दल तुम्ही ऐकले असेल, पण कार हॅक झाल्याचे तुम्ही कधी ऐकले आहे का? जर तुमचे उत्तर नाही असेल, तर मग समजून घ्या की, कार देखील हॅक होऊ शकते. सिक्योरिटी रिसचर्सना अलीकडेच टेस्ला कारमधील एक नव्हे तर तीन प्रमुख त्रुटींबद्दल माहिती मिळाली आहे. आणि विशेष म्हणजे या त्रुटींमुळेच गाडी हॅक होऊ शकते.

Tesla Car
Fossile Fuel : पेट्रोल भरायला गेल्यावर जीवावर बेततील अशा गोष्टी करणं टाळा

सिक्योरिटी रिसर्चच्या मते, टेस्ला गाडीतील तीन त्रुटींमुळे, हॅकर्स कारच्या इन्फोटेनमेंट-हेडलाइट्स बंद करू शकतात, हॉर्न वाजवू शकतात, ट्रंक उघडू शकतात, विंडशील्ड वायपर्स चालू करू शकतात. आणि इतकेच नाही, वाहनाच्या इन्फोटेनमेंट सिस्टममध्ये देखील छेडछाड केली जाऊ शकते.

Tesla Car
Upcoming Cars : एप्रिल मध्ये लॉन्च होणार या पाच जबरदस्त कार्स

सुरक्षा फर्म Synacktiv साठी काम करणाऱ्या सिक्योरिटी रिसर्चने गेल्या आठवड्यात व्हँकुव्हर येथे झालेल्या Pwn2Own परिषदेत या त्रुटींबद्दल माहिती दिली. पण दुसरीकडे, या प्रकरणात टेस्लाने संशोधकांना सांगितले की हॅकर्स कार थांबवू किंवा सुरू करू शकत नाहीत किंवा ते गाडीची चाकं नियंत्रित करू शकत नाहीत.

Tesla Car
Technology Tips : एअरटेलच्या या प्लॅनमध्ये मिळेल अनलिमिटेड डेटा शिवाय Disney Plus Hotstar चं मोफत सबस्क्रिप्शन

पण सिक्योरिटी रिसर्चर एलोई बेनोइस्ट वेंडरबेकेन सांगतात की हे शक्य आहे. या त्रुटी असूनही, टेस्ला आपल्या गाड्या हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी कठोर परिश्रम करत असल्याच्या बातम्या आहेत.

Tesla Car
Public Health System : ‘सार्वजनिक आरोग्य’ला औषधांच्या चणचणीने ग्रासलंय!

Synacktiv (सुरक्षा फर्म) मध्ये काम करणाऱ्या सुरक्षा संशोधकांचे म्हणणे आहे की कंपनी या त्रुटी दूर करण्यासाठी काम करत आहे आणि कंपनी लवकरच आपल्या मॉडेल्ससाठी सॉफ्टवेअर अपडेट्स देईल जेणेकरून या त्रुटी दूर होतील.

Tesla Car
Travel News : सगळीकडे फिरून झालं आता कुटुंबसह ही ट्रीप एन्जॉय करा, वाचा खर्च अन् ठिकाण

टेस्लाने गेल्या महिन्यात अपडेट आणले

टेस्लाने मागील महिन्यात यूएस आणि कॅनडामध्ये आपल्या टेस्ला वाहनांसाठी संपूर्ण सेल्फ-ड्रायव्हिंग बीटा सॉफ्टवेअर आणले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.