Tesla Cybercab : ना स्टिअरिंग व्हील, ना ड्रायव्हर, ना पेडल्स एलॉन मस्कने दाखवली रोबोटॅक्सीची झलक,जाणून घ्या किती आहे किंमत?

रोबोटॅक्सी कशी असेल आणि ती सुरक्षित आहे का? याबद्दल इलॉन मस्क म्हणतात की...
Tesla Cybercab
Tesla Cybercabesakal
Updated on

Tesla Cybercab :  

टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी बरबँक, कॅलिफोर्निया येथे एका कार्यक्रमादरम्यान कंपनीच्या नवीन रोबोटॅक्सी सायबरकॅबचे अनावरण केले. टेस्ला सायबर कॅबची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. कंपनीसाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.

इलॉन मस्कने दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर आपली रोबोटॅक्सी जगासमोर सादर केली आहे.  या रोबोटॅक्सीची अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. मस्कने घोषित केले की या टॅक्सी 2026 पर्यंत बाजारात उपलब्ध होतील.

रोबोटॅक्सी हा टेस्लासाठी एक गेम चेंजर प्रोजेक्ट ठरणार आहे. यामध्ये टेस्ला अशा गाड्या तयार करणार आहे, ज्यामध्ये ना स्टिअरिंग व्हील असेल, ना ड्रायव्हर, ना पेडल्स. या 'टॅक्सी' पूर्णपणे ऑटोमॅटिक असतील. त्या प्रवाशांना पिक करून, अपेक्षित ठिकाणी ड्रॉप करतील. (Robotaxi)

Tesla Cybercab
Elon Musk: सेक्स आणि मुलांना जन्म घालण्याचा आग्रह; मस्क यांचे SpaceX मध्ये अनेक महिलांसोबत होते संबंध- रिपोर्ट

या कार्यक्रमात इलॉन मस्क रोबोटॅक्सीचा प्रोटोटाइप घेऊन स्टेजवर आला. त्यांनी यावेळी टॅक्सीच्या भविष्यातील डिझाइनबद्दल माहिती दिली. या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रीम 'एक्स' या सोशल नेटवर्किंग साइटवर करण्यात आले.

ज्याला 43 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले. कंपनीच्या चांगल्या भविष्यासाठी टेस्ला सायबरकॅबचे यश खूप महत्त्वाचे आहे, असे तज्ञांचे मत आहे कारण कंपनी या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत आहे.

Tesla Cybercab
Elon Musk: इलॉन मस्क जगातील पहिले ट्रिलियनियर होण्याच्या मार्गावर? भारतातील 'या' उद्योगपतीचे नाव चर्चेत
अशी असेल रोबोटॅक्सी
अशी असेल रोबोटॅक्सीesakal

कशी असेल रोबोटॅक्सी ?

रोबोटॅक्सी हे उद्देशाने तयार केलेले स्वायत्त वाहन आहे, ज्यामध्ये स्टीयरिंग व्हील किंवा पेडल्स नसतात. म्हणजे उत्पादन करण्यापूर्वी त्यासाठीची सरकारी नियामकांकडून मान्यता घ्यावी लागेल. त्याची रचना अगदी भविष्यतील गाडी कशी असावी अशी आहे.

ज्यामध्ये फुलपाखराच्या पंखांसारखे दरवाजे वरच्या बाजूस उघडतात आणि एक छोटी केबिन देण्यात आली आहे. ज्यामध्ये फक्त दोन प्रवाशांसाठी बसण्याची सोय करण्यात आली आहे.

प्रोटोटाइप मॉडेल पाहिल्यास असे दिसून येते की, त्यामध्ये कोणतेही स्टीयरिंग व्हील किंवा पेडल्स नाहीत. किंवा त्यामध्ये चार्जिंग प्लगसाठी कोणतीही जागा नाही.

चार्जरचीही आवश्यकता नाही

कंपनीचे सीईओ इलॉन मस्क यांनी सांगितले की, ही रोबोटॅक्सी वायरलेस पद्धतीने वीज घेईल आणि वाहनाची बॅटरी चार्ज करेल. म्हणजेच कोणत्याही स्मार्टफोनप्रमाणे हे वायरलेस चार्जर तंत्रज्ञानाने सुसज्ज असेल.

सुरक्षित आहेत का रोबोटॅक्सी? 

ड्रायव्हरलेस मोटारींबद्दल नेहमीच एक सामान्य समज आहे की त्या ड्रायव्हिंगसाठी सुरक्षित नाहीत. ऑटोनॉमस ड्रायव्हिंगसह सुसज्ज असलेल्या टेल्साच्या कारमध्येही अनेक वेळा दोष दिसून आले आहेत. परंतु असे असूनही, इलॉन मस्क म्हणाले की रोबो कार कोणत्याही सामान्य कार पेक्षा 20 पट अधिक सुरक्षित असतील.  

Tesla Cybercab
Elon Musk : इलॉन मस्कला मिळाली गुड न्यूज! या देशात X प्लॅटफॉर्मवरील बंदी हटवली; सेवा पुन्हा सुरू, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

त्यांची किंमत शहरी बससाठी प्रति मैल $1 च्या तुलनेत केवळ $0.20 प्रति मैल असेल. म्हणजेच कंपनीच्या दाव्यांवर विश्वास ठेवला तर ही रोबोटॅक्सी सुरक्षित असेल. त्याची किंमत 30,000 डॉलर असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टेस्ला पुढील वर्षी टेक्सास आणि कॅलिफोर्नियामध्ये रोबोटॅक्सी ड्रायव्हिंग सुरू करण्याचा विचार करत आहे. सायबरकॅबचे उत्पादन 2026 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे.

इलॉन मस्क यांनी असेही सांगितले की, हा कालावधी 2027 पर्यंत देखील वाढू शकते. सध्या कंपनी या प्रोजेक्टवर काम करत आहे. टेस्ला ऑप्टिमस रोबोट विकसित करत आहे, जो $20,000-30,000 च्या किमतीत उपलब्ध असू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.