Tesla Cybertruck: या गाडीला खरेदी करण्यासाठी लोकांची लागली रांग, लाँचआधीच तब्बल १६ लाख बुकिंग

टेस्ला आपल्या सायबरट्रकला वर्ष २०२३ मध्ये लाँच करणार आहे. या ट्रकची किंमत ५० लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे.
Tesla Cybertruck
Tesla CybertruckSakal
Updated on

Tesla Cybertruck Launch Soon: एलॉन मस्क यांच्या मालकीच्या टेस्ला कंपनीने वर्ष २०१९ मध्ये इलेक्ट्रिक सायबरट्रकला सादर केले होते. २०१९ पासूनच या सायबरट्रकचे बुकिंग सुरू झाले होते. २०२१ पर्यंत याचे प्रोडक्शन सुरू होणार असल्याचा दावा कंपनीने केला होता. मात्र, आता अखेर वर्ष २०२३ मध्ये प्रोडक्शन सुरू होणार आहे. प्रोडक्शनमध्ये उशीर झाला असला तरी सायबरट्रकचे बुकिंग जोरदार सुरू आहे. रिपोर्टनुसार, आतापर्यंत जवळपास १६ लाखांपेक्षा अधिक सायबरट्रकचे बुकिंग झाले आहे. अमेरिकेत या सायबरट्रकची किंमत २८ ते ५० लाख रुपये असू शकते.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

या सायबरट्रकला १०० डॉलर (जवळपास ८ हजार रुपये) पेमेंट करून बुक करता येईल. ही रक्कम पूर्णपणे रिफंडेबल आहे. या सायबरट्रकला जेम्स बाँडचा चित्रपट 'The Spy Who Loved Me' मध्ये वापरण्यात आलेल्या लोटस स्पिरिट एस१ कारपासून प्रेरणा घेऊन बनवण्यात आले आहे.

टेस्ला सायबरट्रकची वैशिष्ट्ये

टेस्लाच्या या सायबरट्रकची बॉडी एक्स३० कोल्ड रोल्ड स्टेनलेस स्टीलपासून बनलेली आहे. तसेच, टेस्लाने अर्मोर ग्लासचा वापर केला असून, फुटू नये यासाठी पॉलिमर लेयर कंपोजिस्टचा वापर केला आहे. कारमध्ये ६ लोक सहज बसू शकतात. यामध्ये १७ इंच टचसक्रीन इंफोटेनमेंट सिस्टम देखील मिळेल

Tesla Cybertruck
PTron Earbuds: अवघ्या ९९९ रुपयात लाँच झाले शानदार इयरबड्स, मिळेल ३२ तासांची बॅटरी लाइफ

टेस्लानुसार, सायबरट्रकमध्ये २८०० लीटर लगेज स्टोरेज स्पेस मिळेल. यात स्टँडर्ड सस्पेंशन दिले असून, यामुळे ४००एमएमचा ग्राउंड क्लियरेंस मिळतो. याच्या बेस व्हर्जनमध्ये सिंगल मोटर RWD (रियर व्हील ड्राइव्ह) आहे व सिंगल चार्जमध्ये ४०० किमी अंतर पार करू शकता. ट्रक अवघ्या ६.५ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग पकडू शकतो. याचा टॉप स्पीड ताशी १७७ किमी आहे. ट्रक ३.४ टन वजन सहज खेचू शकतो.

ट्रकचे ड्यूल व्हील AWD (ऑल व्हील ड्राइव्ह) व्हर्जन ४.५ टन वजन खेचू शकते. सिंगल चार्जमध्ये ट्रक ४८२ किमीपर्यंत अंतर पार करू शकतो. तर याचे टॉप व्हर्जन ट्राय मोटर AWD (ऑल व्हील ड्राइव्ह) हे पॉवरच्याबाबतीत सुपरकार्सला टक्कर देते. हे व्हर्जन अवघ्या २.९ सेकंदात ० ते १०० किमीचा वेग पकडू शकते. सिंगल चार्जमध्ये हा ट्रक ८०० किमी अंतर पार करू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.