Elon Musk: सेक्स आणि मुलांना जन्म घालण्याचा आग्रह; मस्क यांचे SpaceX मध्ये अनेक महिलांसोबत होते संबंध- रिपोर्ट

Elon Musk has unusual sexual relationships: मस्क यांचे त्यांच्या कंपनीतील अनेक महिला कर्मचाऱ्यांसोबत लैंगिक संबंध होते, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.
Elon Musk
Elon Musk
Updated on

नवी दिल्ली- टेस्ला आणि स्पेस एक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी इलॉन मस्क हे कायम चर्चेत राहणारं व्यक्तिमत्व आहे. नुकतेच वॉल स्ट्रीट जनरलच्या Wall Street Journal (WSJ) रिपोर्टमध्ये मस्क यांच्याबाबत मोठा दावा करण्यात आला आहे. मस्क यांचे त्यांच्या कंपनीतील अनेक महिला कर्मचाऱ्यांसोबत लैंगिक संबंध होते, असा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे.

रिपोर्टनुसार, यातील एक कर्मचारी स्पेसएक्समध्ये इंटर्न होती. मस्क यांनी एका महिला कर्मचाऱ्याला मुलांना जन्म घालण्याबाबत विचारणा केली होती असं सांगण्यात आलंय. पण, महिलेने याला नकार दिला. त्यानंतर मस्क यांनी तिचे इन्क्रिमेंट रोखले आणि तिच्या कामाबाबत अनेक दोष दाखवून दिले. रिपोर्टनुसार, टेस्ला आणि स्पेस एक्समध्ये मस्क यांनी महिलांसाठी काहीसे त्रासदायक वातावरण निर्माण केले होते.

Elon Musk
Elon Musk on Apple : ॲपलसोबत OpenAI च्या युतीमुळे इलॉन मस्क संतापले, मोठा निर्णय घेणार? नेमकं काय आहे प्रकरण?

टेस्लाचा हा रिपोर्ट टेक्स्ट मेसेज, इमेल आणि इतर काही कागदपत्रांवर आधारित आहे. तसेच, यासाठी ४८ जणांची मुलाखत घेण्यात आली होती. यामध्ये मित्र, महिला, महिलांचे कुटुंबीय, माजी कर्मचारी यांचा समावेश होता. मस्क यांच्यासोबत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जबाबाच्या आधारे हा रिपोर्ट तयार करण्यात आला आहे. मस्क यांनी अद्याप WSJ च्या रिपोर्टवर प्रतिक्रिया दिलेली नाही.

एका कॉलेज तरुणीने स्पेस एक्समध्ये इंटर्नशिप सुरु केली होती. यावेळी तिने मस्क यांना कंपनीबाबत काही कल्पना सुचवल्या. त्यानंतर दोघांमध्ये भेटीगाठी वाढल्या. त्यांनी लैंगिक संबंध देखील ठेवले. इंटर्नशिपच्या एक वर्षानंतर नव्या इंटर्न कंपनीमध्ये आल्या. त्यानंतर दोघे वेगळे झाले. याची माहिती तरुणीने आपल्या मित्रांना दिली होती, असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.

Elon Musk
SpaceX Starship Landing : इलॉन मस्कच्या स्पेसएक्सने केली कमाल; Starship रॉकेटचं समुद्रावर यशस्वी लँडिंग,व्हिडीओ पाहिलात काय?

एका प्रकरणामध्ये एक महिला कर्मचाऱ्याला एक घोडा घेऊन देण्याच्या बदल्यात मस्क यांनी लैंगिक सुखाची मागणी केली होती, असं सांगण्यात आलंय. रिपोर्टमध्ये असाही दावा करण्यात आला आहे की, २०१३ मध्ये एका महिला कर्मचाऱ्याला मस्क यांनी त्यांच्या मुलांना जन्म घालण्याचा आग्रह धरला होता. दुसऱ्या एका प्रकरणात, मस्क यांचे अनेक महिने एका कर्मचाऱ्यासोबत लैंगिक संबंध होते. पण, त्यानंतर त्यांच्यातील संबध तुटले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.