Tesla FSD : रात्री दोन वाजता अचानक आला अटॅक, टेस्ला गाडीमुळे वाचला जीव! स्वतःच मालकाला नेलं दवाखान्यात

Tesla Car Saves Life : मॅक्सपॉल फ्रँकलीन असं या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीने एका एक्स पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली.
Tesla FSD Lifesaver
Tesla FSD LifesavereSakal
Updated on

Tesla Full-Self Drive saves life : टेस्ला गाड्या आणि त्यांच्या ऑटोपायलेट फीचरची चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. इलॉन मस्कने 1 एप्रिलपासून टेस्लाच्या सर्व गाड्यांमध्ये फुल-सेल्फ ड्रायव्हिंग (FSD) फीचर सुरू केलं आहे. एकीकडे हे फीचर सुरक्षित नसल्याचा दावा नेटिझन्स करत आहेत; तर दुसरीकडे या फीचरमुळे एका व्यक्तीचा जीव वाचल्याचं समोर आलं आहे.

मॅक्सपॉल फ्रँकलीन असं या व्यक्तीचं नाव आहे. या व्यक्तीने एका एक्स पोस्टमध्ये याबाबत माहिती दिली आहे. या व्यक्तीच्या पोस्टला शेअर करत इलॉन मस्कनेही प्रतिक्रिया दिली आहे. "टेस्लाच्या FSD फीचरची तुम्हाला मदत झाली आणि आता तुमची प्रकृती चांगली आहे हे जाणून आनंद झाला" असं इलॉन मस्कने म्हटलं आहे.

नेमकं काय घडलं?

मॅक्सपॉल सांगतात, की "2 एप्रिलच्या पहाटे दोन वाजता मला अचानक डीहायड्रेशन जाणवू लागलं. तसंच, इन्सुलिन पम्पमध्ये काही त्रुटी झाल्यामुळे माझी ब्लड शुगर लेव्हल देखील 670 झाली होती. यावेळी काहीच न सुचल्यामुळे मी माझ्या Tesla Model Y या कारमध्ये बसलो. याच्या स्टिअरिंग कॉलम स्टिकवर डबल टॅप करून FSD फीचर सुरू केलं. त्यानंतर माझ्या कारने मला तब्बल 13 मैल दूर असणाऱ्या रुग्णालयात आरामात नेलं. वाटेत मला सौम्य हृदयविकाराचा धक्का आला. मात्र, वेळीच रुग्णालयात पोहोचल्यामुळे माझा जीव वाचला."

Tesla FSD Lifesaver
Tesla Autopilot: टेस्लाने अखेर नमतं घेतलं! ऑटोपायलट मोडवर अपघातात मृत्यू, भरपाई मागणाऱ्या पीडिताच्या कुटुंबियांशी तडजोड

"माझ्याकडे पोर्श, बीएमडब्ल्यू, अक्युरा आणि कॅडिलॅक अशा महागड्या गाड्या आहेत. मात्र सध्याच्या घडीला टेस्ला ही जगातील सगळ्यात हायटेक गाडी आहे असं मी म्हणू शकतो. इलॉन मस्कचे मी खरंच आभार मानतो. त्यांच्या व्हिजन आणि लीडरशिपला माझा सलाम" असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.