Tesla Walking Job : 7 तास चाला अन् दिवसाला कमवा 28 हजार रुपये! टेस्लाच्या अजब गजब नोकरीची ऑफर,एकदा बघाच

Tesla Job Pays 28,000 Rupees a Day for Walking 7 Hours to Train Humanoid Robots : या नोकरीचे नाव 'डेटा कलेक्शन ऑपरेटर' असून त्यात सात तासांपेक्षा जास्त वेळ मोशन कॅप्चर सूट आणि व्हर्च्युअल रियॅलिटी हेडसेट घालून टेस्ट रूटवर चालावे लागेल.
Tesla Job Pays 28,000 Rupees a Day for Walking 7 Hours to Train Robots
Tesla Pays 28,000 Rupees a Day for Walking 7 Hours to Train Robotsesakal
Updated on

Tesla 7 Hours Walking Job : विश्वप्रसिद्ध इलेक्ट्रिक वाहन कंपनी टेस्लाने एक अजब गजब ऑफर जाहीर केली आहे. कंपनीला अशा व्यक्तींची गरज आहे ज्यांना दिवसाला सात तासांपेक्षा जास्त चालण्याची इच्छा आहे. या कामाबद्दल कंपनी तासाला ४८ डॉलर म्हणजेच जवळपास ४००० रुपये देणार आहे.

टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांनी २०२१ मध्ये ऑप्टिमसची कल्पना मांडली होती. त्यांच्या मते हा रोबोट कारखान्याच्या कामकाजापासून ते रुग्णसेवेपर्यंत अनेक कामे करू शकतो. गेल्या वर्षभरात टेस्लाने ऑप्टिमसच्या प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणावर कामगारांची भरती केली आहे.

या नोकरीचे नाव 'डेटा कलेक्शन ऑपरेटर' असून त्यात सात तासांपेक्षा जास्त वेळ मोशन कॅप्चर सूट आणि व्हर्च्युअल रियॅलिटी हेडसेट घालून टेस्ट रूटवर चालावे लागेल. याशिवाय डेटा कलेक्शन, अहवाल लेखन आणि उपकरणांच्या छोट्याशा कामांची जबाबदारीही यात आहे. या नोकरीसाठी ५ फूट ७ इंच ते ५ फूट ११ इंच उंची, ३० पाउंडपर्यंत वजन उचलण्याची क्षमता आणि दीर्घकाळ VR उपकरण वापरण्याची क्षमता आवश्यक आहे.

Tesla Job Pays 28,000 Rupees a Day for Walking 7 Hours to Train Robots
Zomato AI Image Remove : तुमच्यासाठी काय पण! नाराज ग्राहकांना मनवण्यासाठी Zomatoने अ‍ॅपमधून हटवलं महत्वाचं फीचर

या आकर्षक पगाराशिवाय टेस्लाच्या नोकरीत भरपूर फायदे आहेत. आरोग्य, दंत आणि दृष्टी विमा, कुटुंब नियोजन सहाय्य आणि निवृत्ती वेळेसाठी बचत योजना यासारख्या योजना पहिल्या दिवसापासून मिळतात. याशिवाय टेस्ला बेबीज प्रोग्राम, वजन कमी करण्याचे आणि धूम्रपान बंद करण्याचे प्रोग्राम आणि विविध प्रकारचे विमा पर्याय यासारखे अनोखे लाभही आहेत.

या नोकरीसाठी तासाला २५.२५ ते ४८ डॉलर म्हणजे जवळपास २१२० ते ४००० रुपये पगार आहे. याशिवाय रोख आणि स्टॉक पुरस्कारही मिळू शकतात. ही नोकरी रोबोटिक्स आणि एआय क्षेत्रात काम करण्याची उत्कृष्ट संधी आहे.

Tesla Job Pays 28,000 Rupees a Day for Walking 7 Hours to Train Robots
Realme Super Fast Charging : स्मार्टफोन मार्केटमध्ये Realmeचा धमाका! फक्त 4 मिनिटांत 100% चार्जिंग करणारा सुपर चार्जर

टेस्लाने ही नोकरी तीन शिफ्टमध्ये काढली आहे. सकाळी ८ ते सायंकाळी ४.३०, दुपारी ४ ते रात्री १२.३० आणि रात्री १२ ते सकाळी ८.३० असे वेळापत्रक असेल. नोकरीची सर्व माहिती टेस्लाच्या करिअर पेजवर पाहता येईल. ही नोकरी कालिफोर्नियातील पालो अल्टो येथे आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.