Tesla Robot Attack : टेस्लाच्या फॅक्टरीमध्ये रोबोटने केला इंजिनिअरवर हल्ला; कंपनीने केला प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

हा इंजिनिअर अ‍ॅल्युमिनिअम कापणाऱ्या रोबोटना डिसेबल करत होता. जेणेकरुन त्यावर काम करता येईल. यामधील एक रोबोट चुकून डिसेबल होऊ शकला नाही.
Tesla Robot Attack
Tesla Robot AttackeSakal
Updated on

Tesla Robot Attacks Engineer : आजकाल सर्व ठिकाणी रोबोटचा वापर केला जात आहे. हॉलिवूड किंवा बॉलिवूडच्या चित्रपटांमध्ये आपण कित्येक वेळा पाहिलं आहे, की रोबोट स्वतः विचार करू लागल्यानंतर कशा प्रकारे माणसांवर हल्ले करू लागतात. अशा प्रकारच्या घटना आता खऱ्या जगातही घडू लागल्या आहेत. नुकतंच इलॉन मस्कच्या टेस्ला कंपनीत एका रोबोटने कर्मचाऱ्यावर हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. (Elon Musk)

विशेष म्हणजे, ही घडना दोन वर्षांपूर्वीची आहे. कंपनीने आपली बदनामी होऊ नये यासाठी ही घटना आतापर्यंत लपवून ठेवली होती. मात्र याबाबत आता माहिती समोर आली आहे. मनीकंट्रोलने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Tesla Robot Attack)

ही घटना टेक्ससच्या ऑस्टिन येथे असणाऱ्या फॅक्टरीमध्ये (Tesla Texas Factory) झाली होती. 2021 साली एक इंजिनिअर फॅक्टरीमध्ये काम करत असताना, एका खराब झालेल्या रोबोटने त्याच्यावर हल्ला केला. हा इंजिनिअर अ‍ॅल्युमिनिअम कापणाऱ्या रोबोटना डिसेबल करत होता. जेणेकरुन त्यावर काम करता येईल. यामधील एक रोबोट (Tesla Robot) चुकून डिसेबल होऊ शकला नाही.

Tesla Robot Attack
Robot Killed Man : रोबोटने घेतला माणसाचा जीव; दक्षिण कोरियातील धक्कादायक घटना! काय आहे प्रकरण?

या रोबोटने इंजिनिअरवर हल्ला करत त्याला उचलून आपटलं, ज्यामुळे त्याचं रक्त वाहू लागलं. यानंतर रोबोटने त्या कर्मचाऱ्याचे हात आणि पाठ पकडून ठेवली होती. (Robot Attacks Employee) यावेळी शेजारी असणाऱ्या दुसऱ्या कर्मचाऱ्याने इमर्जन्सी स्टॉप बटण दाबल्यामुळे या इंजिनिअरला सोडलं.

यावेळी हा इंजिनिअर तातडीने बाहेर पळाला, ज्यामुळे सगळीकडे रक्त सांडलं. या घटनेचा रिपोर्ट ट्रेविस काऊंटीचे अधिकारी आणि आरोग्य यंत्रणांना देण्यात आला होता. मात्र, माध्यमांपासून ही बाब लपवण्यात आली होती. या रिपोर्टची एक कॉपी आता समोर आली आहे. टेस्ला कंपनीने मात्र याबाबत अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.