'हे' स्मार्टवॉच मनगटावर बांधल्याबरोबर करेल तुमच्या शुगरची टेस्ट!

'हे' स्मार्टवॉच मनगटावर बांधल्याबरोबर करेल तुमच्या शुगरची टेस्ट! ब्लड टेस्टची नाही गरज
'हे' स्मार्टवॉच मनगटावर बांधल्याबरोबर करेल तुमच्या शुगरची टेस्ट! ब्लड टेस्टची नाही गरज
'हे' स्मार्टवॉच मनगटावर बांधल्याबरोबर करेल तुमच्या शुगरची टेस्ट! ब्लड टेस्टची नाही गरजSakal
Updated on
Summary

हा सेन्सर मधुमेह आणि इतर संबंधित वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांसाठी खरोखरच उपयुक्त ठरू शकतो.

Apple ने अलीकडेच जागतिक स्तरावर वॉच सिरीज 7 लॉंच केले आणि वॉच सिरीज 8 बद्दलच्या अफवा आधीच इंटरनेटवर पसरल्या आहेत. यापूर्वी असं सांगण्यात आलं होतं, की Apple सप्लायर्सपैकी एकाने नवीन सेन्सरची चाचणी सुरू केली जी वापरकर्त्याच्या शुगरची (रक्त-शर्करा) पातळी आणि ब्लड-अल्कोहोल लेव्हल मोजेल. डिजीटाईम्सचा (DigiTimes) एक नवीन रिपोर्ट सूचित करतो, की Enostar आणि Taiwan Asia Semiconductor एका इन्फ्रारेड सेन्सरवर काम करत आहेत जे रक्त-शर्करा पातळी मोजण्यास सक्षम असतील.

'हे' स्मार्टवॉच मनगटावर बांधल्याबरोबर करेल तुमच्या शुगरची टेस्ट! ब्लड टेस्टची नाही गरज
गूगलचे CEO पिचाई म्हणाले, जिओफोन नेक्‍स्ट 'या' दिवशी होईल लॉंच!

अहवालात पुढे म्हटले आहे, की सेन्सर 1,000 nm पेक्षा जास्त वेव्हलेंथ वापरतो आणि फोटोडायोडसह कार्य करतो, जो रक्त-शर्करा पातळी ओळखू शकतो. हा सेन्सर वापरकर्त्याच्या नाडी आणि रक्त-ऑक्‍सिजनचे विश्‍लेषण देखील करू शकतो.

...तर ठरेल गेमचेंजिंग फीचर

रक्तातील साखरेचे मोजमाप साधारणपणे बोटाला सुई टोचून रक्त काढून केले जाते. त्यामुळे Apple Watch हे सेन्सरद्वारे मोजू शकत असेल तर ते गेमचेंजिंग फीचर ठरू शकेल. हा सेन्सर मधुमेह आणि इतर संबंधित वैद्यकीय समस्या असलेल्या लोकांसाठी खरोखरच उपयुक्त ठरू शकतो. विशेष म्हणजे, iOS 15 मध्ये हेल्थ ऍपमध्ये रक्तातील ग्लुकोजचा पर्याय देखील जोडला गेला आहे; परंतु हे व्हॅल्यू आता मॅन्युअली जोडावे लागेल. Apple Watch Series 8 पुढील वर्षी लॉंच होण्याची शक्‍यता आहे.

'हे' स्मार्टवॉच मनगटावर बांधल्याबरोबर करेल तुमच्या शुगरची टेस्ट! ब्लड टेस्टची नाही गरज
तुमच्या संमतीशिवाय कोणीही अ‍ॅड करू शकणार नाही तुम्हाला ग्रुपमध्ये!

Apple Watch Series 7 ची किंमत

Apple Watch Series 7 च्या बेस 41mm ऍल्युमिनियम केस व्हेरिएंटची किंमत 41 हजार 900 रुपये आहे. 45mm ऍल्युमिनियम केस व्हेरिएंटची किंमत 44 हजार 900 रुपये आहे. दोन्ही प्रकारांच्या सेल्युलर मॉडेल्सची किंमत अनुक्रमे 50 हजार 900 आणि 53 हजार 900 रुपये आहे. हे मिडनाईट, स्टारलाइट, ग्रीन, ब्ल्यू आणि लाल रंगाच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्टेनलेस स्टील व्हर्जन 41mm सेल्युलर व्हेरियंटची किंमत 69 हजार 900 रुपये आणि 45mm सेल्युलर व्हेरिएंटची किंमत 73 हजार 900 रुपये आहे. मिलानीज लूपसह वॉचसाठी तुम्हाला अतिरिक्त चार हजार रुपये द्यावे लागतील. हे सिल्व्हर, ग्रेफाइट आणि गोल्ड कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टवॉच आता कंपनीच्या अधिकृत वेबसाइट, Apple अधिकृत रिसेलर्स आणि निवडक कॅरिअर्सच्या माध्यमातून उपलब्ध होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.