तुमच्याकडे किती सिम आहेत? 'या'पेक्षा जास्त ठेवल्यास नंबर होणार बंद

तुमच्याकडे किती सिम आहेत? 'या'पेक्षा जास्त ठेवल्यास नंबर होणार बंद
Sim Card
Sim Cardesakal
Updated on
Summary

सोयीसाठी आजकाल एकापेक्षा जास्त मोबाईल सिमकार्ड वापरण्याची पद्धत रूढ झाली आहे.

सोयीसाठी आजकाल एकापेक्षा अनेक मोबाईल (Mobile) सिमकार्ड (Sim Card) वापरण्याची पद्धत रूढ झाली आहे. एक ऑफिससाठी, एक घरगुतीसाठी तर एक पर्सनलसाठी असे करत अनेकांकडे दहा- बारा सिमकार्ड वापरले जात असल्याचेही दिसून येत आहे. फसवणुकीसाठीही अनेक सायबर क्रिमिनल सिमकार्ड वापरून फेकून देतात, अशाही घटना सर्रास घडत असतात. मात्र, आता एका व्यक्तीच्या नावे किती सिमकार्ड असावेत, याबाबत दूरसंचार विभागाने (Department of Telecommunications) नवीन आदेश काढले आहेत.

Sim Card
HERO चा धमाका! महिन्यात 7 हजारहून अधिक इलेक्‍ट्रिक स्कूटरची विक्री

दूरसंचार विभागाने नऊपेक्षा जास्त सिमकार्ड असलेल्या ग्राहकांच्या सिमची फेरपडताळणी सुरू केली आहे. जर पडताळणीत जास्त सिमकार्ड आढळून आल्यास सिमकार्ड बंद करण्याचे आदेश दिले आहेत. जम्मू- काश्‍मीर आणि आसामसह ईशान्येसाठी ही संख्या सहा सिमकार्डची आहे. दूरसंचार विभागाने टेलिकॉम कंपन्यांना डेटा बेसमधून ते सर्व मोबाइल नंबर हटवण्यास सांगितले आहे, जे नियमांनुसार वापरात नाहीत.

दूरसंचार विभागाने जारी केलेल्या आदेशानुसार, ग्राहकांकडे परवानगीपेक्षा जास्त सिमकार्ड आढळल्यास, त्यांना त्यांच्या आवडीचे सिमकार्ड ठेवण्याचा आणि उर्वरित बंद करण्याचा पर्याय दिला जाईल.

Sim Card
आता PF खात्यातून LIC प्रीमियम भरणे शक्‍य आहे! जाणून घ्या सुविधा

दूरसंचार विभागाने केलेल्या विश्‍लेषणादरम्यान, कोणत्याही ग्राहकाकडे सर्व दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या विहित संख्येपेक्षा जास्त सिमकार्ड असल्याचे आढळल्यास, सर्व सिमकार्डची पुन्हा पडताळणी केली जाईल, असे दूरसंचार विभागाने म्हटले आहे. आर्थिक गुन्हे, आक्षेपार्ह कॉल, ऑटोमेटेड कॉल्स आणि फसवणुकीच्या घटनांचा तपास करण्यासाठी दूरसंचार विभागाने हे पाऊल उचलले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.