भारतीय शास्त्रज्ञांनी दावा केला आहे की 2020 मध्ये कोविड लॉकडाउनच्या काळात पृथ्वीवरील कमी मानवी हालचालींमुळे चंद्राच्या तापमानातही घट झाली होती. या अनपेक्षित घटेचे निरीक्षण रॉयल एस्ट्रोनॉमिकल सोसायटीच्या अभ्यासातून केले गेले आहे. भारतीय फिजिकल रिसर्च लॅबोरेटरीच्या (PRL) के. दुर्गा प्रसाद आणि जी. आंबिली यांनी 2017 ते 2023 या काळातील चंद्राच्या विविध ठिकाणांचे तापमान अभ्यासले आहे.
2020 च्या एप्रिल-मे महिन्यात, जगभरात कठोर लॉकडाउन होते. याच काळात चंद्राच्या तापमानात 8 ते 10 केल्विनची घट नोंदवली गेली. वैज्ञानिकांनी नासाच्या लूनर रेकॉनिसन्स ऑर्बिटर (LRO) मधील डेटा वापरून या घटेचे विश्लेषण केले आहे. विशेष म्हणजे, या घटेचे प्रमुख कारण म्हणजे पृथ्वीवरील मानवी हालचाली थांबणे आणि यामुळे ग्रीन हाऊस वायूंचे उत्सर्जन कमी होणे. लॉकडाउन काळात मानवी हालचालींमुळे होणारा रेडिएशन कमी झाल्याने चंद्राच्या तापमानावरही परिणाम झाला.
चंद्र पृथ्वीच्या रेडिएशनचा एक प्रकारचा "एम्प्लिफायर" म्हणून कार्य करतो, असे या संशोधनातून समजले आहे. प्रसाद यांनी नमूद केले की लॉकडाउनच्या काळात पृथ्वीवरील मानवी हालचाली थांबल्यामुळे रेडिएशन कमी झाले आणि त्याचा परिणाम चंद्राच्या तापमानावरही दिसला. 2020 नंतर, जेव्हा पुन्हा मानवी हालचाली सुरू झाल्या, तेव्हा चंद्राचे तापमानही वाढले.
या अभ्यासात चंद्राच्या विविध स्थळांवरील तापमानाचा सात वर्षांचा डेटा वापरण्यात आला. यामध्ये चंद्राच्या ओशियनस प्रोसेलारम, मारे सेरेनिटॅटिस, मारे इंब्रियम, मारे ट्रॅन्क्विलिटॅटिस, आणि मारे क्रिसियम या ठिकाणांचा समावेश आहे. 2020 मध्ये सर्वात कमी तापमान 96.2 केल्विन इतके नोंदवले गेले, तर 2022 मध्ये हे तापमान 143.8 केल्विनपर्यंत वाढले.
शास्त्रज्ञांच्या मते, चंद्राचे तापमान कमी होण्यामागे सोलर अॅक्टिविटी आणि ऋतुंतील फ्लक्स वेरिएशनसारख्या अन्य कारणांचा प्रभाव नाही. यामुळे कोविड लॉकडाउनचा परिणाम प्रमुख घटक असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
या अभ्यासाचे निष्कर्ष उत्सुकता वाढवणारे असले तरी, अधिक माहिती मिळवून यातील परस्पर संबंध पूर्णपणे समजून घेणे आवश्यक आहे. भविष्यातील चंद्रावरील निरीक्षण केंद्रे पृथ्वीच्या वातावरणातील बदल आणि त्याचा चंद्रावर होणारा परिणाम समजून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरू शकतात. हे संशोधन पृथ्वीवरील मानवी हालचालींनी आपल्या आकाशगंगेत किती दूरवर परिणाम घडवू शकतात हे अधोरेखित करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.