फॉर्च्युनरच्या फेसलिफ्ट आणि ‘लिजेंडर’चा नवा ‘स्पोर्टिव्ह’ रुबाब

२०२१च्या सुरुवातीलाच फॉर्च्युनरचे फेसलिफ्ट आणि ‘लिजेंडर’ हे दोन मॉडेल बाजारात आणले आहेत.
toyota fortuner and legender
toyota fortuner and legender file photo
Updated on

मागील १२ वर्षांपासून टोयोटा ‘फॉर्च्युनर’ने भारतीय बाजारात मजबूत पकड बनवली आहे. ऑगस्ट २००९मध्ये आलेल्या फॉर्च्युनरने भारतातील एसयूव्ही प्रेमींना दमदार पर्याय दिला. दरम्यानच्या काळात फॉर्च्युनरच्या डिझाईनमध्ये थोडेफार बदलही झाले. २०१६मध्ये सेकंड जनरेशन फॉर्च्युनर नव्या बदलांसह बाजारात अवतरली. आता २०२१च्या सुरुवातीलाच फॉर्च्युनरचे फेसलिफ्ट आणि ‘लिजेंडर’ हे दोन मॉडेल बाजारात आणले आहेत. या मॉडेलची ‘लिजेंडर’ची फोर्ड ‘एन्डव्हेअर’, एमजी ‘ग्लोस्टर’, महिंद्रा ‘अल्ट्रस’ या कारशी स्पर्धा असेल.

फॉर्च्युनर लिजेंडर नियमित फॉर्च्युनरपेक्षा अद्ययावत फीचर्ससह बाजारात आणण्यात आली आहे. ज्यात पॉवरचा बूस्टर आणि टर्बो चार्जही आहे. लिजेंडर केवळ २.८ डिझेल, २०१ बीएच पॉवर इंजिनमध्येच उपलब्ध असून, ५०० एनएम टॉर्क जनरेट करते. गाडीत इको, नॉर्मल आणि स्पोर्ट असे तीन ड्रायव्हिंग मोड दिले आहेत. लिजेंडर लक्झरियस एसयूव्ही असल्याने दूरच्या प्रवासात कोणत्याही प्रकारच्या रस्त्यावर चालकासह सहप्रवाशांनाही थकवा जाणवत नाही. लिजेंडरचा समोरील भाग विशेषत: ग्रीलची रचना बदलण्यात आली आहे. नियमित फॉर्च्युनरपेक्षा लिजेंडरचे अलॉय व्हिलची डिझाईन बदलण्यात आली आहे. फॉर्च्युनर लिजेंडरची लांबी, रुंदी, उंची, ग्राउंड क्लिअरन्स नियमित फॉर्च्युनरप्रमाणेच ठेवण्यात आले आहेत. लिजेंडर शहरी रस्त्यांवर आठ, महामार्गावर ९-१० किलोमीटर प्रति लीटरपर्यंत मायलेज देते. सुरक्षेच्या दृष्टीने लिजेंडरमध्ये मल्टिपल एअर बॅग, एबीएस, ईबीडी, ट्रॅक्शन कंट्रोल, ईएसपी आदी सुविधा दिल्या आहेत. लिजेंडरमध्ये पहिल्यांदाच व्हेंटिलेटेड सिटची सुविधा देण्यात आली आहे. लिजेंडरचा डॅशबोर्ड, इन्स्ट्रूमेंट क्लस्टरची स्टाइलही थोडी बदलण्यात आली आहे. लिजेंडरमध्ये पहिल्यांदाच ‘ॲपल कार प्ले’चा पर्याय देण्यात आला आहे.

फॉर्च्युनर लिजेंडर

इंजिन : १GD-FTV Turbo charged

पॉवर : २७५५ Cc, २०१ Bhp, ५०० nm Torque

ट्रान्समिशन : ६ Gear Automatic Torque Converter

बूट स्पेस : २९६ लिटर

किंमत (ऑन रोड) : ४६-४७ लाख

फोर्ड एन्डेव्हेअर स्पोर्ट्स

इंजिन : २.० Eco blue Diesel Engine

पॉवर : १९९६ Cc, १६७.६२ Bhp, ४२० nm Torque

ट्रान्समिशन : १० speed Automatic

बूट स्पेस : ४३० लिटर

किंमत (ऑन रोड) : ४२-४३ लाख

एमजी ग्लोस्टर

इंजिन : २.० Diesel twin turbo

पॉवर : १९९६ Cc, २१५ Bhp, ४८० nm Torque

ट्रान्समिशन : ८ Speed Automatic

बूट स्पेस : ३४३ लिटर

किंमत (ऑन रोड) : ३६-४४ लाख

महिंद्रा अल्ट्र्स

इंजिन : २.२ लिटर ४ cylinder Diesel engine

पॉवर : २१५७ Cc, १७८.४९ Bhp, ४२० nm Torque

ट्रान्समिशन : ७ Speed Automatic

बूट स्पेस : २४० लिटर

किंमत (ऑन रोड) : ३६-४० लाख

संपादन : शर्वरी जोशी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()