The story of the original iPhone: आयफोन खरेदी करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. आजही iPhone खरेदी करणे लग्झरी मानले जाते. याचे प्रमुख कारण म्हणजे या डिव्हाइसमध्ये मिळणारे फीचर्स. सुरक्षा फीचर्स आणि बिल्ट क्वालिटीच्याबाबतीत कोणत्याच फोनची तुलना आयफोनशी होऊ शकत नाही.
वायरलेस डिव्हाइसच्या क्षेत्रात क्रांती आणण्याचे श्रेय आयफोनलाच द्यावे लागते. मात्र, आयफोनच्या निर्मितीची गोष्ट तुम्हाला माहितीये का? आजपासून बरोबर १६ वर्षांपूर्वी पहिल्या वहिल्या आयफोनची घोषणा करण्यात आली होती. ९ जानेवारी २००७ रोजी अॅपलचे सीईओ स्टीव्ह जॉब्स यांनी पहिल्या आयफोनला सादर केले होते. हटके मार्केटिंग, भन्नाट डिझाइन, नवीन फीचर्स यामुळे हा फोन विशेष चर्चेत राहिला होता.
आयफोनची सुरुवात
आयफोन हा काही पहिला वहिला स्मार्टफोन नव्हता. मात्र, तरीही हटके डिझाइन व फीचर्समुळे हा फोन विशेष चर्चेत राहिला व आजही आहे. आयफोनच्या निर्मितीमागे देखील रंजक गोष्ट आहे.
स्टीव्ह जॉब्स यांनी स्कॉट फोर्स्टाल यांना एक टीम बनवण्यास सांगितले होते. या टीमकडे आयफोन निर्मितीचे काम दिले जाणार होते. परंतु, यासाठी एक अट होती ती म्हणजे टीममधील कोणतीही व्यक्ती अॅपलच्या बाहेरची नसेल. विशेष म्हणजे या सदस्यांना त्यांना कोणत्या कामासाठी घेतले जाणार आहे, याचीही माहिती देण्यात आली नव्हते.
या कर्मचाऱ्यांना फक्त एका शानदार प्रोडक्टवर काम करायचे आहे, एवढीच माहिती देण्यात आली होती. तसेच, रात्रं-दिवस, आठवड्याच्या शेवटी देखील काम करावे लागेल, असे सांगण्यात आले होते.
हेही वाचा: Flipkart Sale: निम्म्या किंमतीत खरेदी करा हेडफोन्स-स्पीकर, ऑफरचा आज शेवटचा दिवस
प्रोजेक्ट पर्पल
पहिल्या वहिल्या आयफोनची एकप्रकारे गोपनीय पद्धतीने निर्मिती केली जात होती. आयफोन तयार करण्याच्या या कामाला 'प्रोजेक्ट पर्पल' नाव देण्यात आले होते. तसेच, या कामासाठी अमेरिकेतील क्यूपरटीनो येथील एक इमारत देखील घेण्यात आली होती. कर्मचारी दिवस-रात्र येथेच काम करत होते.
अनेकांना वरील मजल्यावर काय सुरू आहे, याचीही माहिती नव्हती. लोक तेथेच राहायचे, तेथेच काम करायचे. अतिरिक्त कामामुळे लोकांची तब्येत देखील बिघडली, मात्र स्टीव्ह जॉब्स यांनी माघार घेतली नाही.
अॅपलने या प्रोजक्टसाठी हजारो इंजिनिअर्सची नेमणूक केली होती. ३ वर्ष चाललेल्या या मिशनला 'प्रोजेक्ट पर्पल 2' नाव देण्यात आले होते. अखेर अथक मेहनतीच्या जोरावर ९ जानेवारी २००७ ला पहिल्या वहिल्या आयफोनची घोषणा करण्यात आली. पुढे २९ जूनला हा फोन अधिकृतपणे लाँच झाला. पहिल्या वहिल्या आयफोनचे डिझाइन एवढे हटके होते की, आज जवळपास दीड दशकांनंतर देखील ते कायम आहे.
पहिला वहिला iPhone ते iPhone 14
२००७ साली लाँच झालेल्या पहिल्या आयफोनची किंमत ४९९ डॉलर होती. यामध्ये ३.५ इंच डिस्प्ले, २ मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला होता. गेल्याकाही वर्षात आयफोनमध्ये अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. अॅपलने काही महिन्यांपूर्वीच आयफोन १४ सीरिजला लाँच केले आहे. या मॉडेलची किंमत १,४९९ डॉलर आहे. फीचर्सच्याबाबतीत देखील नवीन आयफोनमध्ये अनेक अपग्रेडेड फीचर पाहायला मिळतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.