आज जर्मनीतल्या क्लाॅस्थल इथल्या हर्मन आणि मथिल्डा यांचा मुलगा ‘राॅबर्ट’ याची गोष्ट सांगतो. हा मुलगा लहानपणापासूनच प्रचंड हुशार होता.शाळेत जाण्यापुर्वीच त्याला लिहायला-वाचायला यायचं. ‘गणित आणि विज्ञान’ या दोन्हीही विषयात विशेष रुची असलेल्या या मुलानं वयाच्या एकोणीसाव्या वर्षी गाॅटिंगन विद्यापीठात वैद्यकिय शिक्षणासाठी प्रवेश घेतला.
याच कालावधीत तिथले शरीररचनाशास्त्राचे प्राध्यापक जेकब हेन्ले यांनी ‘संसर्गाचा सिद्धांत’ मांडला आणि या संशोधनात राॅबर्टलाही सामील करून घेतलं अन् राॅबर्टला संशोधन या क्षेत्राचं जणू वेडच लागलं..
शैक्षणिक काळात त्यानं छोट्यामोठ्या अनेक विषयांवर संशोधनात्मक अभ्यास केला आणि उत्तम गुण मिळवत आपलं वैद्यकिय शिक्षण पुर्ण केलं. शिक्षण पुर्ण तर झालं पण तो काळ फ्रान्स-जर्मनी युद्धाचा होता. राॅबर्टनं काही वर्षे शल्यचिकित्सक म्हणून काम केलं आणि नंतर काही काळ वैद्यकिय अधिकारी म्हणून नोकरीही केली.
या अनुभवानंतर राॅबर्ट शासकीय ‘आरोग्य सल्लागार’ या पदावर रुजू झाला आणि इथंच त्याच्या विद्यार्थीदशेतला संशोधक पुन्हा एकदा जागा झाला त्यानं सुक्ष्मजीवांचा अभ्यास करायला सुरूवात केली.
इथं राॅबर्टनं प्रयोगशाळेत जीवाणूंची वाढ करण्याचं तंत्र विकसित केलं यापुढं जात या जीवाणूंमधले आजारास कारणीभूत असणारे जीवाणूंचं विलगीकरण करण्याचं तंत्रही शोधून काढलं आणि सोबतच बर्लिन विद्यापीठात व्यवस्थापक-प्राध्यापक म्हणून कामही केलं.
या सगळ्या अनुभवानंतर राॅबर्टची जर्मनीतल्या संसर्गजन्य आजारांवर संशोधन करणाऱ्या संस्थेत संचालकपदी नेमणूक झाली..इथं त्यानं क्षयरोगावर संशोधन केलं पण आरोग्य मंत्रालयानं याचं श्रेय व्यक्तीश: त्याला दिलं नाही त्यामुळं संशोधनाचे पेटंट राॅबर्टनं गमावलं.या तात्विक मतभेदानंतर राॅबर्ट ट्रिपॅन्सोमियॅसिस म्हणजेच निद्राविकार या आजारावर संशोधन करण्यासाठी पुर्व आफ्रिकेत रवाना झाला. त्याच्या शिबीरात रोज हजारो रुग्ण येत असत.
यानुसार पहिलं म्हणजे लक्षण दिसले म्हणजे जीवाणूही सापडला पाहिजे, दुसरं या जीवाणूचं विलगीकरण करता यायला हवं, तिसरं हा जीवाणू जर निरोगी शरीरात गेला तर तिथं त्यानं तेच लक्षणं दाखवली पाहिजे आणि चौथं म्हणजे लक्षण असलेल्यांकडून मिळवलेला जीवाणू आणि आधी विलगीकरण केलेला जीवाणू हे सारखेच पाहिजे..
तोपर्यंत क्षय हा अनुवंशिक आजार मानला जात होता.राॅबर्टनं पहिल्यांदा हा जीवाणूजन्य आजार असल्याचं मांडलं आणि त्याच्या चार सिद्धांतानुसार याचा गिनिपीगवर यशस्वी डेमो देखील दिला. यानंतर इजिप्तमधल्या पटकीच्या साथीनं राॅबर्टचं लक्ष्य वेधून घेतलं तिथं जात त्यानं या आजाराच्या जीवाणूचंही विलगीकरण केलं..
इथून काही दिवस इराणला घालवल्यानंतर मायदेशी जाण्याऐवजी राॅबर्ट भारतात आला आणि तत्कालिन बाॅम्बे राज्यातल्या ग्रॅंट मेडिकल काॅलेज इथं संशोधनात्मक काम केलं. इथं त्याला प्रतिकारक्षमता ही गोष्टही उमगली.
एव्हाना राॅबर्टच्या कामाचा विस्तार डोंगराएवढा झाला होता त्याला वैद्यकशास्त्रातल्या संशोधनासाठी नोबेल पुरस्कार मिळाला पण या पुरस्काराहूनही मोठं काय होत माहितेय?
आजारांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, आधी प्रचंड धास्ती असायची ती कमी झाली याबद्दल खरं तर लिहावं तेवढं कमीच..
आपल्या संशोधनानं जग बदलवून टाकणाऱ्या ‘राॅबर्ट कोक’ यांचा आज जन्मदिन..विनम्र अभिवादन !!!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.