S. Somanath : अंतराळ उद्योग ‘खासगी’ भरारी घेणार ; विपुल संधी असल्याचे ‘इस्रो’च्या संचालकांचे मत

भारतीय अंतराळ उद्योगात वाढ व विकासाचे नवीन दालन म्हणून खासगी क्षेत्राला विपुल संधी असल्याचे मत ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी व्यक्त केले.
S. Somanath
S. Somanathsakal
Updated on

कोची : भारतीय अंतराळ उद्योगात वाढ व विकासाचे नवीन दालन म्हणून खासगी क्षेत्राला विपुल संधी असल्याचे मत ‘इस्रो’चे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी व्यक्त केले. सध्या देशाच्या अंतराळ उद्योगाची उलाढाल दोन अब्ज डॉलर असून येत्या पाच ते दहा वर्षांत ती नऊ ते दहा अब्ज डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे त्यांनी सांगितले.

नेस्ट ग्रुपच्या ‘एसएफओ टेक्नॉलॉजिस’ या प्रमुख कंपनीच्या कार्बन उत्जर्सन कमी करण्याच्या उपक्रमाचे उद्‌घाटन केल्यानंतर सोमनाथ बोलत होते. ते म्हणाले, की इस्रोने आपल्या विविध मोहिमांसाठी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाचा ४०० हून अधिक खासगी कंपन्यांना फायदा झाला आहे. केंद्र सरकारने अंतराळ उद्योगासाठी आणलेल्या नवीन धोरणात्मक उपक्रमाचा फायदा घेण्यासाठी ‘एसएफओ टेक्नॉलॉजिस’सारख्या कंपन्या सुस्थितीत आहेत. भारतीय अंतराळ उद्योग वाढ आणि विकासाचे एक नवीन क्षेत्र म्हणून खासगी क्षेत्रांना प्रचंड संधी उपलब्ध करून देत आहे.

सोमनाथ यांच्या हस्ते नेस्ट हितेक पार्क येथे वृक्षारोपण करण्यात आले. त्याचप्रमाणे, एसएफओ टेक्नॉलॉजिस आणि इस्रोचे सहकार्य अधोरेखित करणाऱ्या चांद्रयानाच्या प्रतिकृतीचे उद्‌घाटनही त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी ‘नेस्ट’चे अभियंते आणि व्यवस्थापन टीमशीही संवाद साधला.

महत्त्वाच्या मोहिमांत सहकार्य

संयुक्त राष्ट्रांनी २०३५ पर्यंत कार्बन उत्सर्जन ५० टक्के कमी करण्याचे तसेच २०४० पर्यंत शून्य उत्सर्जनाचे ध्येय ठेवले आहे. या धर्तीवर ‘नेस्ट ग्रुप’ने कार्बन उत्सर्जन कमी करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. अनेक वर्षांपासून ‘एसएफओ टेक्नॉलॉजिस’ इस्रोबरोबर नजीकचे सहकार्य करत आहे. चांद्रयान, आदित्य, गगनयान आदी महत्त्वाकांक्षी मोहिमांमध्ये ‘एसएफओ टेक्नॉलॉजिस’ ने इस्रोला सहकार्य केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.