'ब्लू टूथ' म्हणजे काय? या नावामागे आहे एक विचित्र कथा

ब्लू टूथद्वारे, लोक कोणत्याही वायरशिवाय फाइल्स ट्रान्सफर करू शकतात.
Bluetooth
Bluetooth Sakal
Updated on

ब्लू टूथद्वारे, लोक कोणत्याही वायरशिवाय फाइल्स ट्रान्सफर करू शकतात. वायरलेस तंत्रज्ञानाद्वारे, लोक त्यांच्या फोनला इयरफोन जोडून गाणी ऐकत राहतात आणि कॉलवर देखील बोलू शकतात. अशा परिस्थितीत ब्लूटूथ या शब्दाशी संबंधित काही फॅक्ट्स आपण जाणून घेऊया..

Bluetooth
WhatsApp च्या मदतीने घरबसल्या बदला UPI पिन; कसे ते जाणून घ्या

ब्लूटूथ नावामागचा इतिहास

ब्लूटूथचे नाव कोणत्याही तंत्रज्ञानाशी संबंधित नसून एका राजाच्या नावावर आहे. त्याचबरोबर अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावाही करण्यात आला आहे की, ब्लूटूथच्या नावामागे निळे दात देखील जोडला गेलेला आहे. ब्लूटूथचे नाव मध्ययुगीन स्कॅन्डिनेव्हियन राजाच्या नावावर आहे. त्या राजाचे पूर्ण नाव हॅराल्ड ब्लूटूथ गोर्मसन (Harald Bluetooth Gormsson) होते. तो दोन गोष्टींसाठी ओळखला जात होता, 958 मध्ये डेन्मार्क आणि नॉर्वेचे एकत्रीकरण आणि दुसरे म्हणजे त्याच्या मृत दात ज्याचा रंग गडद निळा/राखाडी होता. यानंतर त्याला ब्लूटूथ हे टोपणनाव मिळाले.

Bluetooth
हाडांमध्ये लपलाय ओमिक्रॉनला हरवण्याचा उपाय!

या व्यक्तीने दिले कनेक्टिव्हिटी असे नाव

राज्याच्या नावावरच या तंत्रज्ञानाचे नाव ठेवण्यात आले होते. ब्लूटूथचे मालक जाप हार्टसेन (Jaap HeartSen, Ericsson ) हे एरिक्सन (Ericsson) कंपनीत रेडिओ सिस्टम (Radio System ) म्हणून काम करायचे. तसेच, एरिक्सनबरोबरच नोकिया, इंटेलसारख्या कंपन्याही त्यावर काम करत होत्या. अशा अनेक कंपन्यांना मिळून एक गट तयार करण्यात आला होता, ज्याला SIG (Special Interest Group) असे नाव देण्यात आले होते.

किंग हेराल्डने वाढवली होती कनेक्टिव्हिटी

ब्लूटूथच्या मालकाने या तंत्रज्ञानाचे नाव त्या राजाच्या नावावर का ठेवले? असा प्रश्न अनेकांच्या मनात येतो. तर याचे उत्तर असे आहे की, ब्लूटूथ इलेक्ट्रॉनिक उपकरणांना जोडण्याचे काम करते, त्याच प्रकारे किंग हेराल्ड ब्लूटूथ याने राज्यांना जोडले होते. यामुळे ब्लूटूथ तयार करणाऱ्या टीमचे सदस्य जिम कार्डेक यांनी त्या तंत्रज्ञानासाठी ब्लूटूथचे नाव सुचवले. जे सर्वांना आवडले, त्यानंतर त्या तंत्रज्ञानाचे नाव ब्लूटूथ ठेवण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.