एका चार्जवर धावतात 100 किमी; पाहा देशातील काही दमदार ई-स्कूटर्स

Ola Electric Scooters
Ola Electric Scootersesakal
Updated on

Best Electric Scooters : भारतीय बाजारपेठेत इलेक्ट्रिक स्कूटरची (Electric Scooter) मागणी सातत्याने वाढत आहे. लोकांना कमी किमतीत बेस्ट फीचर्स आणि रेंज असलेली स्कूटर खरेदी कराण्याकडे ओढा वाढला आहे, आज आपण भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या अशा स्कूटर्सबद्दल सांगणार आहोत, ज्या एकदा चार्ज केल्यानंतर तब्बल 100 किमी अंतर चालतात.

ओकिनावा i-प्रेज (i-Praise)

या इलेक्ट्रिक स्कूटरचा एकच व्हेरिएंट उपलब्ध असून, ज्याची दिल्लीत किंमत 1,20,000 रुपये आहे. हे एकदा संपूर्ण चार्ज केल्यावर हे स्कूटर 139 किमी पर्यंतची रेंज देते. त्याचा टॉप स्पीड 58 किलोमीटर प्रति तास आहे. दुसरीकडे, जर आपण त्याच्या चार्जिंग वेळेबद्दल बोललो, तर एकदा पूर्ण चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात.

ओला एस-1 (Ola S1)

या इलेक्ट्रिक स्कूटरचा एकच व्हेरिएंट आहे, ज्याची दिल्लीत किंमत 91000 रुपये आहे. हे एकादा पूर्ण चार्ज केल्यावर 121 किमी पर्यंतची रेंज देते. याच्या टॉप स्पीडबद्दल बोलायचे झाले तर हे स्कूटर ताशी 90 किलोमीटरची टॉप स्पीड देते. तसेच या स्कूटरला पूर्ण चार्ज होण्यासाठी 5 तास लागतात.

Ola Electric Scooters
Jio चा 'हॅपी न्यू इयर 2022' प्लॅन, 365 दिवस मिळाणार खास बेनिफिट्स

ओला एसवन प्रो (Ola S1 Pro)

या इलेक्ट्रिक स्कूटरचा एकच व्हेरिएंट असून त्याची दिल्लीत किंमत 114000 रुपये आहे. हे एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 181 किमी पर्यंतची रेंज देते. त्याचा टॉप स्पीड 115 किलोमीटर प्रति तास आहे. याची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 6 तास 30 मिनिटे लागतात.

हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा एचएक्स (Hero Electric Optima HX)

ही इलेक्ट्रिक स्कूटर डबल बॅटरीसह फक्त एका व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे, ज्याची दिल्लीत किंमत 69000 रुपये आहे. हे एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 122 किमी पर्यंतची रेंज देते. तर त्याचा टॉप स्पीड 42 किलोमीटर प्रति तास आहे. त्याच्या चार्जिंग वेळेबद्दल बोलायचे झाल्यास, याची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात.

Ola Electric Scooters
फ्लिपकार्टवर स्वस्तात खरेदी करा प्रीमीयम स्मार्टफोन; मिळतेय खास ऑफर

हिरो इलेक्ट्रिक फोटॉन (Hero Electric Photon)

या इलेक्ट्रिक स्कूटरचा एकच व्हेरिएंट उपलब्ध आहे, ज्याची दिल्लीत किंमत 78000 रुपये आहे. एकदा पूर्ण चार्ज केल्यावर हे स्कूटर 122 किमी पर्यंतची रेंज देते. त्याचा टॉप स्पीड 42 किलोमीटर प्रति तास असून याची बॅटरी पूर्ण चार्ज होण्यासाठी 4-5 तास लागतात.

Ola Electric Scooters
Honda Activa 125 प्रीमियम एडिशन भारतात लाँच; पाहा किंमत-फीचर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()