Airtel आणि Vi चे प्रीपेड प्लॅन्स, मिळेल तीन महिन्यांपर्यंत व्हॅलिडिटी

Airtel Vodafone idea new recharge plan
Airtel Vodafone idea new recharge plan Google
Updated on

Prepaid Plans : Airtel आणि Vodafone Idea त्यांच्या ग्राहकांना असंख्य प्रीपेड प्लॅन ऑफर करतात. मागच्या काही दिवसांपूर्वी दोन्ही कंपन्यांनी त्यांचे दर 20-25% ने वाढवले आहेत, त्यानंतर आता बरेच प्लॅन बदलले गेले आहेत आणि अनेक नवीन प्लॅन देखील देण्यात येत आहेत. आज आपण Airtel आणि Vi च्या अशा काही प्लॅन्सबद्दल जाणून घेणार आहोत जे तुम्हाला पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याच्या त्रासापासून मुक्त करतील आणि चांगले बेनिफिट्स देखील देतील. आज आपण Airtel-Vi च्या 700 रुपयांपेक्षा कमी किमतीच्या अधिक फायदेशीर प्लॅन्सबद्दल जाणून घेणार आहोत

एअरटेल प्रीपेड प्लॅन्स (Airtel Prepaid Plans)

Airtel त्यांच्या ग्राहकाना 700 रुपयांपेक्षा कमीत पाच प्लॅन ऑफर करते ज्यांची वैधता 56 ते 84 दिवस आहे. या सर्व प्लॅन्सची किंमत 400 रुपयांपेक्षा जास्त आहे. या सर्व प्लॅनमध्ये एअरटेल थँक्स अॅप आणि अॅमेझॉन प्राइम मोबाइल व्हर्जनचे फ्री सबस्क्रिप्शन देण्यात येत. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

  1. Airtel Rs 666 प्रीपेड प्लॅन - हा Airtel Rs 666 प्लॅन 1.5 GB डेटा/दिवस, अमर्यादित कॉल आणि 100 SMS/दिवस ऑफर करतो. हा प्लॅन 77 दिवसांच्या वैधतेसह येतो.

  2. Airtel चा 455 रुपयांचा प्रीपेड प्लॅन: जास्त दिवस वैधता शोधत असलेल्या ग्राहकांसाठी, 455 चा प्रीपेड प्लॅन हा बेस्ट पर्याय आहे. प्लॅन अंतर्गत, ग्राहकांना अमर्यादित कॉल्स आणि 900 एसएमएससह एकूण 6GB डेटा मिळतो. हे 84 दिवसांसाठीचा प्लॅन आहे.

  3. Airtel चा 549 रुपयांचा प्रीपेड प्लॅन - हा प्लॅन 100 SMS/दिवस आणि अमर्यादित कॉलसह 2GB डेटा/दिवस ऑफर करतो.

  4. Airtel चा 479 रुपयांचा प्रीपेड प्लॅन - हा प्लॅन 56 दिवसांच्या वैधतेसह येतो आणि ज्यांना दररोज 1.5GB डेटा मर्यादा हवी आहे त्यांच्यासाठी हा प्लॅन परफेक्ट आहे. या प्लॅनमध्ये 100 SMS/दिवस आणि अमर्यादित कॉल देखील मिळते.

Airtel Vodafone idea new recharge plan
आरोग्य सेवांच्या बाबतीत केरळ देशात अव्वल; उत्तर प्रदेश सर्वात वाईट

Vodafone Idea चे प्रीपेड प्लॅन

हे प्लॅन किंमत आणि डेटाच्या बाबतीत Airtel सारखेच आहेत. परंतु Vodafone Idea आपल्या वापरकर्त्यांना Binge All Night प्लॅनची सुविधा देते, ज्या अंतर्गत वापरकर्त्यांना रात्री 12 ते सकाळी 6 पर्यंत मोफत डेटा मिळतो, साप्ताहिक डेटा रोलओव्हर सुविधा, ज्यामुळे दरमहा 2 GB अतिरिक्त डेटा बॅकअप मिळू शकतो.

  1. Vodafone Idea चा 599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन - हा Vi प्रीपेड प्लॅन 1.5GB डेटा/दिवस, अमर्यादित कॉल, 70 दिवसांसाठी 100 SMS आणि Vi कडून प्रमुख डेटा ऑफर देण्यात येतात, या प्लॅनची ​​वैधता 70 दिवसांची आहे.

  2. Vodafone Idea चा 329 रुपयांचा प्रीपेड प्लॅन - 56 दिवसांच्या वैधतेसह येणारा Vi चा हा प्लॅन Vi फ्लॅगशिप डेटा ऑफर नाहीये. तुम्ही डेटा विक्रेता नसल्यास आणि संपूर्ण दिवस मोबाइल डेटावर अवलंबून नसल्यास, Vodafone Idea 329 प्लॅन पुरेसा आहे कारण तो एकूण 4GB डेटा, अमर्यादित कॉल आणि 600 SMS देतो. ग्राहक Vi Movies आणि TV मध्ये देखील एक्सेस करू शकतात.

  3. Vodafone Idea 537 रुपयांचा प्रीपेड प्लॅन - अनेक कंपन्या 60 दिवसांची वैधता ऑफर करत नाहीत. परंतु हा प्लॅन 60 दिवसांच्या वैधतेसह येतो. प्लॅन अंतर्गत, ग्राहकाला 50 जीबी डेटा, अमर्यादित कॉल्स आणि 100 एसएमएस/दिवस मिळतात.

  4. Vodafone Idea चा 539 रुपयांचा प्रीपेड प्लॅन - तुम्हाला Vi कडून फ्लॅगशिप डेटा ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर 539 चा प्लॅन 537 पेक्षा चांगला आहे. हा प्लॅन 56 दिवसांसाठी दररोज 2GB डेटा, अमर्यादित कॉल आणि 100 SMS/दिवस ऑफर करतो. हा प्लॅन 56 दिवसांसाठी वापरता येईल.

  5. Vodafone Idea चा 666 रुपयांचा प्रीपेड प्लॅन - Airtel च्या 666 रुपयांच्या प्रीपेड प्लॅन प्रमाणेच, या प्लॅनमध्ये 1.5GB/दिवस डेटा, 100 SMS/दिवस आणि 77 दिवसांसाठी मोफत कॉल्स मिळतात.

  6. Vodafone Idea चा 459 रुपयांचा प्रीपेड प्लॅन - ज्या ग्राहकांना डेटा साठी तुलनेत 84 दिवसांची वैधता हवी आहे ते या पर्यायाची निवड करू शकतात. या प्लॅनमध्ये 6GB डेटा लाभ, 1000 SMS आणि अमर्यादित कॉल उपलब्ध आहेत. प्लॅनमध्ये Vi ​​Movies आणि TV चा एक्सेस देखील आहे.

Airtel Vodafone idea new recharge plan
Children's Vaccination : CoWIN वर रजिस्ट्रेशन कसे करावे? जाणून घ्या

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.