या आहेत देशातील बेस्ट आणि सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार्स

electric car
electric car sakal media
Updated on

जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल आणि कोणती कार घ्यावी याचा निर्णय घेऊ शकत नसाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कमी बजेटमध्ये चांगले मायलेज आणि बेस्ट फीचर्स असलेली कार घेताना भविष्यातील शक्यतांचा विचार करणे गरजेचे आहे. तुमच्यासाठी आता पेट्रोल-डिझेल, सीएनजी व्यतिरिक्त आता इलेक्ट्रिक कारही भारतीय बाजारपेठेत उपलब्ध आहेत. त्यामुळे तुमच्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम ठरेल याचा व्यवस्थित विचार केल्यानंतरच कार खरेदीचा निर्णय घ्या. आज आपण भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या बेस्ट इलेक्ट्रिक कारचे फीचर्स, किंमती आणि ड्रायव्हिंग रेंज बद्दल जाणून घेणार आहोत

Tata Nexon EV

टाटा मोटर्सने भारतात इलेक्ट्रिक कारची सुरुवात त्यांच्या लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV Tata Nexon च्या इलेक्ट्रिक व्हेरिएंटने केली आहे. ही कार फक्त 9.9 सेकंदात 0 ते 100 किमी/ताशी वेग पकडते. कारमध्ये परमनंट मॅग्नेट एसी मोटर दिली आहे, जी 245 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजीन IP67 सर्टिफाईड 30.2 kWh लिथियम-आयन बॅटरीने सपोर्टेड आहे. बॅटरी एका तासात 80% पर्यंत चार्ज होऊ शकते. तुम्ही होम चार्जर वापरत असल्यास, बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी 8 तास लागतील. ही कार एकदा पूर्ण चार्ज केल्यावर 312 किमी पर्यंत धावू शकते.

ड्रायव्हिंग रेंज - 312 किमी

किंमत- 14.24 लाख

Audi e-tron SUV

लक्झरी इलेक्ट्रिक एसयूव्हीमध्ये ऑडीची ई-ट्रॉन हा बेस्ट पर्याय आहे. त्याचा टॉप स्पीड 210 किमी/तास असून यात दोन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत. त्याची मोटर 355 bhp ची मॅक्सिमम पॉवर आणि 561 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. हे पॉवर आउटपुट 402 bhp आणि 664 Nm पर्यंत जाते. मॉडेल फक्त 5.7 सेकंदात 0-100 किमी प्रतितास वेग गाठते तसेच कंपनीचा दावा आहे की 95 kWh बॅटरी पॅकमधून पूर्ण चार्ज केल्यावर ही कार 484 किमी चालते. रेग्युलर चार्जरच्या मदतीने साडेआठ तासांत ही पूर्णपणे चार्ज होते.

ड्रायव्हिंग रेंज - 484 किमी

किंमत- 99.99 लाख

electric car
जिओने पुन्हा लाँच केले 5 नवे प्लॅन; वाचा काय आहेत बेनिफिट्स

MG ZS EV

MG Motor ची इलेक्ट्रिक SUV MG ZS EV देखील भारतीय बाजारात उपलब्ध आहे. हा देखील ग्राहकांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो. ही कार फक्त 8 सेकंदात 0-100 किमी/ताशी वेग गाठते. यात 44.5kwh चा बॅटरी देण्यात आली आहे. जी एसी फास्ट चार्जरने 6-8 तासात 80 टक्के चार्ज होईल. डीसी सुपरफास्ट चार्जरने त्यासाठी 50 मिनिटांपेक्षा कमी वेळेत पूर्ण चार्ज होऊ शकते.

ड्रायव्हिंग रेंज- 340 किमी

किंमत – 20.88 लाख

Hyundai Kona Electric

Hyundai Kona इलेक्ट्रिक बेस्ट ड्रायव्हिंग रेंजसह येते. तसेच सामान्य चार्जरने ते 6 तास 10 मिनिटांत पूर्णपणे चार्ज होऊ शकते. त्याच वेळी, ही इलेक्ट्रिक एसयूव्ही डीसी फास्ट चार्जरने 57 मिनिटांत 80 टक्के चार्ज होईल. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही 9.7 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तास वेग पकडू शकते. या कारचा टॉप स्पीड 200 किलोमीटर प्रति तास आहे.

ड्रायव्हिंग रेंज - 452 किमी

किंमत- 23.79 लाख

electric car
टाटाच्या 'या' कार्सवर मिळतोय जबरदस्त डिस्कांउट; पाहा डिटेल्स

सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tigor EV

तसे, सध्या भारतीय बाजारपेठेत 10 हून अधिक इलेक्ट्रिक कार उपलब्ध आहेत, तुम्हाला भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार TATA TIGOR EV ही भारतातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. Tata Tigor EV ची किंमत 11.99 लाख पासून सुरू होते. हे दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. ही 5 सीटर कार असून त्याची बॅटरी एका तासात 80 टक्के चार्ज होऊ शकते. बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी आहे. कंपनीचा दावा आहे की नवीन टिगोर एका चार्जवर 250 किमी धावू शकते.

ड्रायव्हिंग रेंज - 250 किमी

किंमत- 11.99 लाख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.