Cheapest Daily Use Cars : भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारच्या कार उपलब्ध आहेत, जर तुम्ही किफायतशीर आणि चांगले मायलेज देणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी अनेक ऑप्शन्स तुमच्यासमोर उपलब्ध आहेत. आज आपण अशाच काही दररोजच्या वापरासाठी देशातील सर्वात स्वस्त कारबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या मायलेजच्या बाबतीत दमदार तर आहेच तसेच तुमच्या बजेटमध्येही बसतील.
मारुती सुझुकी अल्टो
तुम्ही रोजच्या वापरासाठी मारुती सुझुकी अल्टो हा बेस्ट ऑप्शन आहे , कारण त्याचा आकार तुम्हाला कोणत्याही ट्रॅफिकमधून नेव्हिगेट करण्यास मदतीचा ठरतो, तुम्ही अल्टो कार 2,94,800 रुपयेच्या किमतीत खरेदी करू शकता. त्याच्या इंजिनबद्दल बोलायचे झाल्यास, यामध्ये तुम्हाला 796 cc 3-सिलेंडर इंजिन मिळते, जे 6000 rpm वर 47 hp ची पॉवर आणि 3500 rpm वर 69 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. मारुती सुझुकी अल्टो 1 लिटर पेट्रोलमध्ये 22.05 kmpl पर्यंत मायलेज देते. जर तुम्ही CNG मॉडेलचा विचार केला तर त्याचे मायलेज 31.59 किमी/किलो आहे.
मारुती एस-प्रेसो
मारुती एस-प्रेसो ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त कार आहे. भारतीय बाजारपेठेत या कारची किंमत फक्त 3.7 लाख रुपये आहे. दुसरीकडे, या कारमध्ये 998 cc 3-सिलेंडर K10B पेट्रोल इंजिन दिले आहे, जे 55,00 rpm वर 67 bhp ची पॉवर आणि 35,00 rpm वर 90 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. याशिवाय मायलेजबद्दल बोलायचे झाले तर मारुती एस-प्रेसो 1 लीटर पेट्रोलमध्ये 21.4 किमी मायलेज देते.
मारुती सुझुकी सेलेरियो
भारतीय बाजारपेठेत मारुती सुझुकी सेलेरियोला खूप पसंती दिली जाते, किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, तुम्ही ते 4,31,289 लाख रुपयांच्या किंमतीमध्ये खरेदी करू शकता. यात तुम्हाला 998 cc BS6 इंजिन दिले आहे, जे 3500 rpm वर 90 Nm पीक टॉर्क जनरेट करते.
दॅटसन रेडी गो
ही कार 8.0 लीटर आणि 1.0 लीटर पेट्रोल इंजिन ऑप्शन मध्ये येते. 8.0 लीटरचे इंजिन 53 एचपी पॉवर देते. तसेच याचे मायलेज 20.71 किलोमीटर प्रति लीटर आहे. 1.0 लीटरचे इंजिन 67 एचपी पॉवर जनरेट करते. या कारचे मायलेज मॅन्यूअल गियरबॉक्स सोबत 21.7 किलोमीटर आणि एएमटी गियरबॉक्स सोबत 22 किलोमीटर प्रति लीटर आहे. 0.8 लीटर इंजिन मॉडलची सुरुवातीची किंमत 2.83 लाख रुपये आणि 1.0 लीटरच्या इंजिनच्या मॉडलची किंमत 4.44 लाख रुपये आहे.
मारुती वॅगनआर
5 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत मारुतीची वॅगनआर उपलब्ध आहे. ही कार दोन पेट्रोल इंजिनच्या ऑप्शनमध्ये येते. ज्यात 1 लीटर आणि 1.2 लीटरच्या इंजिनचा समावेश आहे. 1 लीटर इंजिनच्या मॉडलची किंमत 4.45 लाख रुपयांपासून सुरू होते. हे इंजिन 67 एचपी पॉवर देते. याचे मायलेज 21.79 किलोमीटर प्रति लीटर आहे. स्वस्तात मस्त आणि 5 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत कार खरेदी करायची असेल तर तुमच्या समोर मारुती वॅगन आर हाही एक चांगला पर्याय आहे.
ह्युंदाई सँट्रो
इतर कार प्रमाणे ह्युंदाईची सँट्रो सुद्धा 5 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारी स्वस्त कार आहे. या कारमध्ये 1.1 लीटरचे इंजिन मिळते. जे 69 पीएसचे पॉवर देते. या सोबतच 5 स्पीड मॅन्यूअल आणि एएमटी गियरबॉक्सचे ऑप्शन मिळतात. सँट्रोच्या या कारची किंमत 4.57 लाख रुपयांपासून सुरू होते. तुमचे बजेट 5 लाखांपेक्षा कमी असेल तर तुमच्यासमोर ह्युंदाईची सँट्रो हाही एक चांगला पर्यात आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.