दिवाळीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सणासुदीच्या काळात नोव्हेंबर महिन्यात भारतात अनेक दमदार स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. यामध्ये Poco M4 Pro 5G आणि Lava Agni या दोन बजेट स्मार्टफोन्सच्या लॉन्चची घोषणा करण्यात आली आहे. हे दोन्ही 5G स्मार्टफोन 9 नोव्हेंबरला एकाच दिवशी लॉन्च होतील. याशिवाय Moto 51 5G, Oppo Foldable Phone आणि Redmi Note 11 सीरीजची घोषणा करण्यात आली आहे. तसेच Nokiaचा T20 टॅबलेट देखील याच महिन्यात बाजारात दाखल होणार आहे. आज आपण या सर्व फोनच्या फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत..
Poco M4 Pro 5G
Poco M4 Pro 5G चे जागतिक लॉन्च 9 नोव्हेंबर रोजी होणार आहे. या फोनमध्ये तुम्हाला 6.50-इंचाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे, ज्याचे रिझोल्यूशन 1080x2400 पिक्सेल आहे. तर या फोनमध्ये तुम्हाला MediaTek Dimensity 700 SoC प्रोसेसर देण्यात आला असून फोन Android 11 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. Poco M3 Pro 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. ज्यामध्ये तुम्हाला 48MP प्रायमरी लेन्स, 2MP मॅक्रो आणि 2MP डेप्थ सेन्सर दिला जाऊ शकतो. तर सेल्फीसाठी 8MP फ्रंट कॅमेरा आहे. पॉवरसाठी फोनमध्ये 5000mAh बॅटरी देण्यात आली आहे.
LAVA Agni 5G
LAVA चा हा पहिला 5G स्मार्टफोन 9 नोव्हेंबर रोजी लॉन्च होईल. 9 नोव्हेंबर रोजी दुपारी 12 वाजता फोन लॉंच केला जाईल. तसेच LAVA AGNI 5G स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेला सपोर्ट करेल. हा स्मार्टफोन ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 810 5G चिपसेटवर काम करेल. तु्म्हालायात 5,000mAh ची बॅटरी, यूएसबी टाइप-सी पोर्टसाठी सपोर्ट दिला जाईल या फोनची संभाव्य किंमत 9,999 रुपये असेल.
Redmi Note 11 सीरीज
Redmi Note 11 सीरीज चीनमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. ती भारतात नोव्हेंबरमध्ये लॉन्च होईल. या सीरीजमध्ये तीन स्मार्टफोन Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus लॉंच करण्यात येतील. या 5G स्मार्टफोनमध्ये 50MP कॅमेरा मिळेल. तर Redmi Note 11 Pro आणि Note 11 Pro Plus मध्ये 108MP कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच Redmi Note 11 5G स्मार्टफोनमध्ये स्क्रीन 6.6 इंच आकारात दिली जाईल. तर त्याचा रीफ्रेश रेट 90Hz आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 810 प्रोसेसर देण्यात आले असून ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. त्याचा मुख्य कॅमेरा 50MP असेल. तर दुय्यम कॅमेरा 8MP चा असेल. सेल्फीसाठी 16MP कॅमेरा असेल. या सीरीजमधील स्मार्टफोन 15,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान ऑफर केले जाऊ शकतात.
Moto G51 5G
Moto G51 5G नोव्हेंबरमध्ये लॉन्च होऊ शकतो. या स्मार्टफोनमध्ये Snapdragon 750G प्रोसेसर, 4 GB RAM आणि 128 GB पर्यंत स्टोरेज मिळू शकते. तसेच हा फोन 5G सपोर्ट आणि 50MP ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप सोबत उपलब्ध असेल.
Oppo फोल्डेबल फोन
Oppo चा हा फोल्डेबल स्मार्टफोन नोव्हेंबरमध्ये लॉन्च होऊ शकतो. या फोल्डेबल फोनमध्ये तुम्हाला स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसर, 8-इंचाचा OLED डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटसह देण्यात येऊ शकतो. फोनच्या मागील पॅनलवर 50-मेगापिक्सेल कॅमेरा असेल.
Nokia T20 टॅब्लेट
नोकियाच्या या Nokia T20 टॅबलेटचे मायक्रोसाइट ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवर लाइव्ह झाले आहे. यात तुम्हाला 10.4-इंचाचा 2K डिस्प्ले आणि त्यासोबत 8200mAh बॅटरी दिली जाऊ शकते. टॅबलेटमध्ये 8MP रियर कॅमेरा आणि Unisoc T610 Octa-Core चिपसेट दिला जाऊ शकतो. तसेच Nokia T20 टॅबलेटच्या वाय-फाय व्हेरियंटची किंमत 199 युरो (सुमारे 17,200 रुपये) आहे. त्याच्या Wi-Fi + 4G मॉडेलची किंमत 239 युरो (सुमारे 20,600 रुपये) आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.