Wireless Charger चे हे बेस्ट ऑप्शन्स मिळतील फक्त १००० रुपयांना

टेक्नोलॉजीमध्ये दररोज नवीन शोध
Wireless Charger
Wireless Chargeresakal
Updated on

Wireless Charger : टेक्नोलॉजीमध्ये दररोज नवीन शोध लागतात. अगदी तुम्ही तुमच्या हातात आलेल्या कॉम्पॅक्ट वस्तू पहिल्या तर तुमच्या लक्षात येईल. म्हणजे एकेकाळी अगदी एखाद्या खोलीएवढा मोठा कंप्युटर आज अगदी कॉम्पॅक्ट येत आहे, तेही जास्त फीचर्ससह.

Wireless Charger
KTM Bike : KTM ला हलक्यात घेऊ नका, रॉयल एन्फिल्डला टक्कर देण्यासाठी आणलीय प्रीमियम बाईक

तसंच दररोज नवनवीन शोध लागतच असून वायरलेस चार्जर हा एक फार भारी शोध असून यामुळे फोन चार्ज करणे खूप सोपे झाले आहे. आता यामुळे वायर्सचं टेन्शन नाही की काही नाही, तुम्हाला फक्त फोन चार्जिंग पॅडवर ठेवावा लागेल आणि काही तासांतच तुमचा फोन चार्ज होईल. आता तुम्हीही वायरलेस चार्जर खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर आम्ही तुम्हाला काही वायरलेस चार्जर्सची यादी शेअर करत आहोत. जे अगदी बजेटमध्येही आहेत आणि चांगल्या कंपनीचेही आहेत.

Wireless Charger
Amazon Prime Video : 1 वर्षासाठी मोफत, नेटफ्लिक्सलाही या स्वस्त प्लॅनचा फायदा

UNIGEN UNIPAD (९९९ रुपये)

UNIGEN UNIPAD हा एक उत्कृष्ट डिझाइन असणारा वायरलेस चार्जर आहे. या चार्जरमध्ये कंपनीने चांगल्या क्वॉलीटीचे साहित्य वापरल्याने याची बिल्ड क्वॉलिटीही चांगली आहे. या चार्जरमध्ये रंग बदलणारा एलईडी देण्यात आला आहे. विशेष म्हणजे Unigen Unipad चं खास फीचर म्हणजे हे फोनवर केस असतानाही फोन चार्ज करते. हा चार्जर Qi वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो. यासोबतच हे क्विक चार्ज 2.0/3.0 आणि 15W स्पीडसह येते.

Wireless Charger
Motorola Moto G : स्मार्टफोनचा बाप परत आला ! मोटोरोलाने लॉंच केले दोन नवीन स्मार्टफोन

RAEGR Arc One (८९९ रुपये)

RAEGR कंपनीचा RAEGR Arc One हा फास्ट वायरलेस चार्जर Qi प्रमाणित आहे. यात 15W/10W/7.5W/5W फास्ट चार्जसाठी सपोर्टेड आहे. हा एक बजेट वायरलेस चार्जर उपलब्ध आहे. हे Apple MagSafe सपोर्टसह येत असल्याने iPhone 14/13/12 हे देखील याने चार्ज करू शकते. यासोबतच या चार्जमध्ये आर्क वन आणि एअर व्हेंटचाही सपोर्ट घेण्यात आला आहे.

Wireless Charger
New SUV launch : यंदा बाजारात येणार 3 नव्या एसयूव्ही

eller santé® (MONTCLAD Series) (९९९ रुपये)

eller santé® हा देखील एक आकर्षक आणि स्टाइलिश डिझाइनसह येणारा वायरलेस चार्जर आहे. यात हीट योग्यप्रकारे मॅनेज होईल असं डिझाइन आहे. जे चार्जिंग दरम्यान फोन आणि चार्जर दोन्ही थंड ठेवतं. हा चार्जर ओव्हर टेम्परेचर प्रोटेक्शन, ओव्हरसी प्रोटेक्शन, ओव्हर करंट प्रोटेक्शन आणि ओव्हर चार्जर प्रोटेक्शनसह येतो. यासोबत, हा केस फ्रेंडली चार्जर असून फोनला केस जोडलेला असतानाही डिव्हाइस चार्ज करतो. यासोबतच बिल्ट इन LED येतो. हे जास्तीत जास्त 15W गतीसह येते.

Wireless Charger
Maruti Suzuki Baleno बनली पूर्वीपेक्षा सुरक्षित, मारूतीने आणले अनेक नवीन सेफ्टी फीचर

Spigen Essential Wireless (६९९ रुपये)

Spigen Essential Wireless चार्जर हा कंपनीने 6mm स्लिम डिझाईन आणि नो स्लिप पॅडसह आणला आहे. हा चार्जर 15W फास्ट वायरलेस चार्जिंग सपोर्टसह येतो. यासोबतच, कंपनीचा दावा आहे की हा चार्जर अगदी टिकाऊ आहे जो अनेक क्वॉलीटी चेकअप्ससह येतो. कमी तापमान आणि ड्रॉप चाचणी असे फीचर्सही यात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.