हा Air conditioner तुमच्या गादीला ठेवेल गारेगार; मग झोपा बिन्धास्त !

या एअर कंडिशनरची खास गोष्ट म्हणजे तुम्ही बेडवर झोपताच ते थंड होऊ लागते.
portable air conditioner
portable air conditionergoogle
Updated on

मुंबई : जुलै महिना चालू आहे; मात्र पाऊस पडत नसेल त्यावेळी खूपच गरम होते. अशावेळी एअर कंडिशनर (एसी) हा चांगला मार्ग असतो. बरं प्रत्येकाने एअर कंडिशनर्स पाहिले असतील. एक स्प्लिट एअर कंडिशनर आणि दुसरा विंडो एअर कंडिशनर.

एक घराच्या खिडकीवर, तर दुसरा घराच्या आतल्या भिंतीवर बसवता येतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा एअर कंडिशनर (AC) बद्दल सांगणार आहोत जे बेडच्या गादीवर बसवता येऊ शकते. (portable air conditioner)

portable air conditioner
Google, Facebook ला द्यावा लागणार बातम्यांचा मोबदला

बाजारात तीन प्रकारचे एअर कंडिशनर उपलब्ध आहेत ज्यामध्ये पहिला विंडो एअर कंडिशनर, दुसरा स्प्लिट एअर कंडिशनर आणि तिसरा पोर्टेबल एअर कंडिशनर आहे. हे एअर कंडिशनर एक प्रकारचे पोर्टेबल एअर कंडिशनर आहे. या एअर कंडिशनरची खास गोष्ट म्हणजे तुम्ही बेडवर झोपताच ते थंड होऊ लागते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास जास्त वेळ लागत नाही.

portable air conditioner
या वैशिष्ट्यांमुळे चर्चेत आहे Ather 450X इलेक्ट्रिक स्कूटर

या एअर कंडिशनरची (एसी) किंमत 15,000 ते 16,000 रुपयांदरम्यान आहे. हे एअर कंडिशनर एक नव्हे तर दोन युनिट्सचे बनलेले आहे. एकदा या दोन युनिट्सची भेट झाली की हे एअर कंडिशनर पूर्ण होते.

हे कसं काम करतं ?

वास्तविक हे एअर कंडिशनर (AC) प्रत्यक्षात एक गादीसह येते. पाईपच्या मदतीने, ते बेडवर वापरल्या जाणार्‍या एअर कंडिशनरच्या गादीला जोडले जाते. पाईपमधून थंड हवा थेट गादीच्या आत जाते. यानंतर जर एखादी व्यक्ती त्यावर आडवे पडली तर त्याला थंडावा जाणवू लागतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.