नवी दिल्ली : मारुती सुझुकी ही भारतीय बाजारपेठेतील सर्वांत मोठी कार (car) उत्पादक कंपनी आहे. परंतु, तिचे एक मॉडेल अनेक महिन्यांपासून लोकांच्या मनावर अधिराज्य करीत आहे. आपण बोलत आहे मारुती वॅगनआर या लोकप्रिय झालेल्या गाडीविषयी...
वॅगनआरचे नवीन मॉडेल लाँच झाल्यापासून ते लोकांची पहिल्या क्रमांकाच्या पसंतीत राहिले आहे. मे २०२२ मध्ये, WagonR (Maruti) देशात सर्वाधिक मागणी असलेल्या टॉप मॉडेलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. असे असूनही टॉप ५ च्या यादीतील ४ मॉडेल्स मारुतीमध्ये समाविष्ट आहेत. त्याचवेळी टॉप ५ मध्ये टाटा नेक्सन एसयूव्हीचा देखील समावेश आहे.
मे महिन्यात गाड्यांना सर्वाधिक मागणी असल्याने त्या सर्व मॉडेल्सच्या १० हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली आहे. आम्ही आता तुम्हाला गाड्यांच्या टॉप ५ मॉडेल्सबद्दल माहिती सांगणार आहोत.
१) मारुती सुझुकी वॅगनआर गेल्या महिन्यात लोकांनी लोकप्रिय गाडी राहली आहे. मारुतीच्या (Maruti) वॅगनआरवर ग्राहकांनी सर्वाधिक प्रेम केले. मे मध्ये कंपनीने आपली १६,८१४ WagonR विकली, तर मे २०२१ मध्ये कंपनीचा आकडा WagonR च्या २,०८६ युनिट्स होता. म्हणजेच एका वर्षात या कारने ७०६% ची वाढ केली आहे.
२) टाटा नेक्सॉन गेल्या महिन्यात, लोकांनी टाटाच्या नेक्सॉन गाडी खूप आवडली आहे. मे मध्ये, कंपनीने आपले १४,६१४ Nexon विकले, तर मे २०२१ मध्ये कंपनीचा आकडा Nexon ची ६,४३९ युनिट्स होता. म्हणजेच, या कारने एका वर्षात १२७% ची वाढ केली आहे.
३) मारुती स्विफ्ट गेल्या महिन्यात मारुतीची स्विफ्ट देखील लोकांना खूप आवडली आहे. मे मध्ये, कंपनीने आपल्या १४,११३ स्विफ्टची विक्री केली आहे, तर मे २०२१ मध्ये, कंपनीचा आकडा स्विफ्टच्या ७,००५ युनिट्स होता. म्हणजेच एका वर्षात या कारने १०२% ची वाढ केली आहे.
४) मारुती बलेनो गेल्या महिन्यात मारुतीची बलेनो लोकांना आवडत आहे. मे मध्ये, कंपनीने आपली १३,९७० WagonR विकली, तर मे २०२१ मध्ये कंपनीचा आकडा बलेनोच्या ४,८०३ युनिट्स होता. म्हणजेच, या कारने एका वर्षात १९१% ची जबरदस्त वाढ केली आहे.
५) मारुती अल्टो मागच्याच महिन्यात मारुतीच्या अल्टोनेही चांगलीच ताकद दाखवली. मे मध्ये, कंपनीने १२,९३३ अल्टोची विक्री केली, तर मे २०२१ मध्ये कंपनीचा आकडा अल्टोच्या ३,२२० युनिट्स होता. म्हणजेच, या कारने एका वर्षात ३०२% ची जबरदस्त वाढ केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.