Fire Crackers : प्रदूषण अन् आग लागण्याची भीती सोडा; यंदाच्या दिवाळीला वापरा इलेक्ट्रॉनिक फटाके!

Diwali Air Pollution : यावर्षी प्रदूषणामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी दिवाळीत फटाके वाजवण्यावर निर्बंध लागू केले आहेत.
Electronic Fire Crackers
Electronic Fire CrackerseSakal
Updated on

Electronic Fire Crackers : दिवाळी आली की फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाची चर्चा पुन्हा सुरू होते. तसंच कित्येक ठिकाणी फटाक्यांमुळे आग लागण्याच्या दुर्दैवी घटनांची नोंदही ठरलेलीच असते. यामुळे कित्येक लोक फटाके न वापरण्याचा निर्णय घेतात. मात्र, फटाक्यांशिवाय दिवाळीची मजा ती काय? यामुळेच या दिवाळीला अधिक आनंदी बनवण्यासाठी तुम्ही इलेक्ट्रॉनिक फटाक्यांचा पर्याय वापरू शकता.

यावर्षी प्रदूषणामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांनी दिवाळीत फटाके वाजवण्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्यावर उपाय म्हणून तुम्ही इलेक्ट्रॉनिक फटाके मागवू शकता. हे स्मार्ट डिव्हाईसेस असतात, जे लाईट आणि साऊंड जनरेट करतात. यामुळे खरोखरचे फटाके वाजवल्याचा आनंद मिळतो.

काय होतो फायदा?

इलेक्ट्रॉनिक फटाक्यांचा सर्वात मोठा फायदा म्हणजे यामुळे प्रदूषण आणि दुर्घटनांना आळा बसतो. तसंच, एकदा खरेदी केल्यानंतर हे फटाके पुढील काही वर्षे पुन्हा-पुन्हा वापरता येतात. त्यामुळे ही एक अत्यंत फायद्याची वन-टाईम इन्व्हेस्टमेंट ठरते. या फटाक्यांचा वापर करणंही अगदी सोपं असतं.

Electronic Fire Crackers
Delhi Air Pollution: दिल्लीच्या हवेत सुधारणा; पावसानंतर प्रदूषणापासून दिलासा, AQI 400वरून 100 वर घसरला

असं करतात काम

या फटाक्यांमध्ये एकमेकांशी कनेक्ट असणारे छोटे-छोटे पॉड्स असतात. या पॉड्समध्ये LED लाईट्स असतात. प्लग करुन सुरू केल्यानंतर या पॉड्समध्ये असणाऱ्या लाईट्स थोड्या-थोड्या कालावधीनंतर स्पार्क करतात. यासोबत साऊंडही जोडल्यास खरोखरचे फटाके वाजत असल्याचा आभास निर्माण होतो.

या डिव्हाईसेसना रिमोटने कंट्रोल देखील करता येतं. तसंच, फटाके वाजण्याच्या वेळा देखील बदलता येऊ शकतात. यांचा आवाज खऱ्या फटाक्यांएवढा मोठा नसतो. मात्र, तुमच्यापुरती दिवाळी तुम्ही नक्कीच साजरी करू शकता. (Tech News)

Electronic Fire Crackers
Air Pollution : फटाकेच नाहीतर, अगरबत्ती अन् कॉईल जाळणे देखील टाळा, महाराष्ट्र सरकारचा सल्ला!

किती असते किंमत?

ऑनलाईन शॉपिंग वेबसाईट्सवरुन तुम्ही इलेक्ट्रॉनिक फटाके खरेदी करू शकता. अमेझॉनवर साधारणपणे 2,500 रुपयांपर्यंत हे डिव्हाईस उपलब्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.