इन्स्टाग्रामच्या थ्रेड्स अॅपने आल्याबरोबर नवीन रेकॉर्ड केले होते. एका महिन्याच्या आतच तब्बल 250 मिलियन यूजर्सची नोंद या अॅपवर झाली होती. मात्र, त्यानंतर अॅक्टिव्ह यूजर्सच्या संख्येत मोठी घट दिसून आली. नवीन काहीच नसल्यामुळे लोकांचा यातील रस गेला असल्याचं तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
यामुळेच, इन्स्टाग्रामने आता थ्रेड्स अॅपमध्ये नवीन फीचर्स अॅड केले आहेत. इन्स्टाचे हेड अॅडम मोसेरी यांनी एका थ्रेड्स पोस्टमधून याबाबत माहिती दिली. थ्रेड्सचा यूजरबेस पुन्हा वाढावा यासाठी हे फीचर्स देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. (Threads by Instagram)
थ्रेड्स अॅपवर आता 'फॉलोविंग' हा टॅब जोडण्यात आला आहे. यामुळे रँडमली कोणत्याही पोस्ट न दिसता, तुम्हाला तुम्ही ज्यांना फॉलो करत आहात त्या व्यक्तींच्या पोस्ट क्रोनोलॉजिकल ऑर्डरमध्ये दिसणार आहेत. ट्विटर (एक्स) वर हे फीचर आधीपासूनच उपलब्ध आहे. (Threads New Updates)
यूजर्स आता अॅक्टिव्हिटी फीड अधिक चांगल्या प्रकारे कस्टमाइझ करू शकणार आहात. आता यूजर्स फॉलो, रिपोस्ट, मेन्शन इत्यादी गोष्टी अधिक सोप्या पद्धतीने पाहू शकणार आहेत.
जर तुमचं अकाउंट प्रायव्हेट असेल, तर क्विक व्ह्यूच्या माध्यमातून तुम्ही लवकरात लवकर नवीन फॉलोवर्सना अप्रूव्ह करू शकता.
अॅक्टिव्हिटीमधील नोटिफिकेशन्सना फिल्टर लावता येणार आहे.
तुमच्या फॉलोवर्सना फॉलो बॅक करण्यासाठी फॉलो बटण देण्यात आलं आहे.
थ्रेड्सवर दिसणाऱ्या पोस्ट तुम्ही एका क्लिकवर ट्रान्सलेट करू शकणार आहात.
अॅडम यांनी आपल्या पोस्टमध्ये शेवटी 'ही केवळ सुरूवात' असल्याचं म्हटलं आहे. म्हणजेच थ्रेड्स अॅपमध्ये आणखी अपडेट येण्याची शक्यता आहे. तसंच, काही दिवसांमध्ये थ्रेड्सचं वेब व्हर्जन लाँच केलं जाऊ शकतं असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.