Tinder Subscription Plan : खरं प्रेम शोधणं एवढं महाग? 'टिंडर'चा नवा प्लॅन लाँच, किंमत महिना 41,000 रुपये फक्त!

Tinder Ultra Premium Plan : या प्लॅनचं नाव 'टिंडर सिलेक्ट' असं ठेवण्यात आलंय.
Tinder Subscription Plan
Tinder Subscription PlaneSakal
Updated on

Tinder Select : ये इश्क नहीं आसान.. ही शायरी तर तुम्ही ऐकलीच असेल. आजकाल खऱ्या प्रेमाचा शोध घेणं हे खरोखरच अगदी अवघड होऊन बसलं आहे. मनासारखा जोडीदार मिळाल्यानंतर देखील त्याला किंवा तिला खुश ठेवण्यासाठी गिफ्ट्स, फिरायला जाणं अशा कित्येक प्रकारचा खर्च करावाच लागतो. मात्र, या सगळ्या तर जोडीदार मिळाल्या नंतरच्या गोष्टी. आता तर मनासारखा जोडीदार शोधण्यासाठीच तुम्हाला खिसा रिकामा करावा लागणार आहे.

देशातील कित्येक तरुण-तरुणी आजकाल डेटिंगसाठी, ऑनलाईन पार्टनर शोधण्यासाठी डेटिंग अ‍ॅप्सची मदत घेत असतात. टिंडर हे भारतातील सर्वात लोकप्रिय डेटिंग अ‍ॅप्सपैकी एक आहे. या अ‍ॅपने आता आपला एक नवा अल्ट्रा-प्रीमियम प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची फी दरमहा केवळ 499 डॉलर्स, म्हणजेच सुमारे 41,000 रुपये एवढी आहे.

Tinder Subscription Plan
AI Partner : डेटिंग अ‍ॅप्स, सोशल मीडिया सोडा; आता एआयच्या मदतीने घडवा मनासारखा जोडीदार!

टिंडर सिलेक्ट

या प्लॅनचं नाव 'टिंडर सिलेक्ट' असं ठेवण्यात आलंय. ब्लूमबर्गने दिलेल्या वृत्तानुसार, या प्लॅनमध्ये यूजर्सना एक्सक्लुझिव्ह सर्च आणि मॅचिंग असे फीचर्स मिळणार आहेत. तसंच, हा प्लॅन घेतलेल्या यूजर्सची प्रोफाईल प्राधान्याने इतरांसमोर येणार आहे. सोबतच हा प्लॅन घेतल्यानंतर यूजर्स मॅच न होणाऱ्या प्रोफाईल्सना सुद्धा मेसेज करू शकणार आहेत.

सर्वांसाठी नाही प्लॅन

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा प्लॅन केवळ ठराविक यूजर्ससाठी उपलब्ध होणार आहे. जे नियमितपणे आणि मोठ्या प्रमाणात टिंडरचा वापर करत आहेत, केवळ अशाच यूजर्सना या प्लॅनचा पर्याय मिळेल. त्यासाठी देखील यूजर्सना पाच अटींचं पालन करावं लागणार आहे.

Tinder Subscription Plan
Online Fraud : काय असते रोमान्स स्कॅम? लाखोंचा गंडा पडण्याआधी ऑनलाइन डेटिंग करणाऱ्यांनी व्हा सावध

कोणत्या आहेत अटी?

हा प्लॅन घ्यायचा असेल, तर त्या यूजरचा प्रोफाईल फोटो हा व्हेरिफाईड असणं गरजेचं आहे. सोबतच, प्रोफाईल बायोग्राफी अपडेट असायला हवी. या यूजर्सनी आपले पाच इंटरेट्स मेन्शन केलेले असायला हवेत. तसंच, प्रोफाईलवर त्यांचे कमीत कमी चार फोटो अपलोड असायला हवेत. यासोबचतच, महत्त्वाची अट म्हणजे त्यांना कशा प्रकारच्या रिलेशनशिपमध्ये आवड आहे, हे त्यांनी स्पष्ट करायला हवं.

मिळणार बॅज

या सर्व अटींची पूर्तता केल्यानंतर यूजर्स नवीन अल्ट्रा प्रीमियम प्लॅन घेऊ शकतील. यानंतर त्यांना एक एक्सक्लुझिव्ह सिलेक्ट बॅज मिळेल. अर्थात, हा बॅज प्रोफाईलवर दाखवायचा की नाही याचा पर्याय यूजर्सकडे असणार आहे.

Tinder Subscription Plan
Shraddha Murder Case : आफताब अन् श्रद्धा भेटलेले Bumble डेटिंग अ‍ॅप किती सुरक्षित

टिंडरचे इतर प्लॅन

भारतात टिंडर प्लस आणि टिंडर गोल्ड असे दोन सबस्क्रिप्शन प्लॅन सध्या उपलब्ध आहेत. यातील टिंडर प्लससाठी एका महिन्याचा प्लॅन हा 355 रुपये (89 रुपये प्रति आठवडा) आहे. तर, सहा महिन्यांचा प्लॅन हा 1,418 रुपये एवढा आहे. सोबतच, एका वर्षासाठी 2,128 रुपयांचा एक प्लॅनही उपलब्ध आहे.

टिंडर गोल्डमध्ये एका महिन्याचा प्लॅन हा 567 रुपये आहे, तर सहा महिन्यांचा प्लॅन 2,128 रुपये आहे. यातील एका वर्षाचा प्लॅन हा 3,192 रुपये आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.