Tinder Matchmaker : आता आई-बाबा शोधू शकतील तुमच्यासाठी टिंडरवर पार्टनर

आता तुमचे पालक आणि मित्र तुम्हाला ऑनलाइन डेट शोधण्यात मदत करू शकतील
Tinder Matchmaker
Tinder Matchmakeresakal
Updated on

Tinder Matchmaker : आता तुमचे पालक आणि मित्र तुम्हाला ऑनलाइन डेट शोधण्यात मदत करू शकतील. प्रसिद्ध डेटिंग अॅप टिंडरने त्यासाठी एक नवीन फीचर आणलं आहे. तुम्ही खूप लाजाळू व्यक्ती आहात का? जर होय, तर काळजी करण्याची गरज नाही कारण आता तुमचे पालक आणि मित्र देखील टिंडरवर तुमच्यासाठी एक परफेक्ट मॅच शोधू शकतात.

काही लोक जोडीदार बनवण्यापूर्वी कुटुंबीय आणि मित्रांचा सल्ला घेतात. तुम्हीही हे करत असाल तर प्रसिद्ध डेटिंग अॅपने एक उत्तम व्यवस्था केली आहे. आता मॅचमेकिंग अॅपवर एक नवीन फीचर आलं आहे जे तुम्हाला मदत करेल. टिंडरवर मॅचमेकर नावाचं एक नवं फीचर आलेलं आहे याद्वारे तुमचे कुटुंबातील सदस्य आणि मित्र तुमच्यासाठी जोडीदार निवडू शकतील.

Tinder Matchmaker
Health Tips In Asthma : वातावरण बदलताच अस्थमाचा त्रास वाढलाय? या गोष्टींचे सेवन करा अन् राहा फिट

टिंडरने भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इंडोनेशिया, जपान, मेक्सिको, दक्षिण कोरिया, स्पेन, थायलंड, युनायटेड किंगडम आणि व्हिएतनाममध्ये 'मॅचमेकर' हे नवीन फीचर लाँच केलं आहे. आगामी काळात, कंपनी इतर ठिकाणी देखील हे फीचर देण्याच्या विचारात आहे. पुढे तुम्ही पाहू शकता की Tinder Matchmaker तुम्हाला सर्वोत्तम भागीदार शोधण्यात कशी मदत करू शकते.

Tinder Matchmaker
Health Tips : जास्त लोणचे खाल तर दवाखान्यात जाल? पटत नसेल तर वाचा

टिंडर मॅचमेकर : मॅचमेकर असं काम करेल

तुम्ही तुमच्या प्रोफाइल कार्डवर किंवा अॅप सेटिंग्जमध्ये टिंडर मॅचमेकर सेशन टॅब शोधू शकता.त्यानंतर तुम्ही प्रोफाइल कार्डची युनिक लिंक 24 तासांच्या कालावधीत जास्तीत जास्त 15 कुटुंब सदस्य किंवा मित्रांसोबत शेअर करू शकता.

Tinder Matchmaker
Health Tips :  पोटात गॅस झाला की कळायचंच बंद होतं, लगेचच करा हे उपाय,फरक पडेल

तुमचे मॅचमेकर बनू इच्छिणारे कुटुंबातील सदस्य आणि मित्र एकतर टिंडरमध्ये लॉग इन करू शकतात किंवा गेस्ट म्हणून अॅप वापरू शकतात. (हे वय पडताळणीनंतर आणि टिंडरच्या अटी पूर्ण केल्यानंतर केले जाऊ शकते.)मॅचमेकर्सना प्रोफाइल तपासण्यासाठी 24 तास मिळतात आणि जर ते त्या व्यक्तीला ओळखतात, तर ते त्यांचे मत इतर टिंडर युजर सोबत शेअर करू शकतात.

Tinder Matchmaker
Health Care News : चहा-कॉफीमध्ये साखर टाळण्यासाठी 'या' गोष्टींचा करा वापर

मॅचमेकर हे फीचर टिंडर अॅपद्वारे देखील ब्राउझ केले जाऊ शकते.तुमचा मॅचमेकर तुमच्यासाठी प्रोफाइलची शिफारस करू शकतो. परंतु, तो तुमच्या वतीने चॅट करू शकणार नाही किंवा संदेश पाठवू शकणार नाही.एकदा हे सेशन संपलं की, तुम्हाला मॅचमेकर्सनी निवडलेली प्रोफाइल पाहण्याची संधी मिळेल. मॅचमेकरकडून लाईक्स मिळालेल्या प्रोफाइलवर 'शिफारस' म्हणून खूण केली जाईल. अंतिम निर्णय तुमच्या हातात आहे. तुम्हाला कोण आवडतं हे तुम्ही स्वतः ठरवू शकता. मात्र तुम्हाला हे देखील माहित असेल की तुमचे कुटुंबातील सदस्य आणि मित्र तुमच्यासाठी कोणत्या प्रकारचा जोडीदार निवडतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()