सध्या केवळ संपर्कासाठीच नव्हे तर वेगवेगळ्या गरजांसाठी प्रत्येकजणच व्हाट्सअपचा वापर करत. इथे तुम्हाला तुमच्या जवळच्या व्यक्तीसोबत चॅट Chatting करणं , त्याच्यासोबत फोटो, व्हिडीओ Video शेअर करणं शक्य होतं. व्हाट्सअप गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळे नवे फिचर्स लॉन्च करत आहे.
WhatsAppचं प्रत्येक फिचर खुप खास आहे. WhatsAppच्या या खास फिचर्समुळेस आज करोडो युजर व्हाट्सअपशी जोडले गेले आहेत. Tips to know how to share WhatApp Status with Facebook Instagram
व्हाट्सअपच्या युजर्समध्ये सध्याच्या घडीला लोकप्रिय आणि आवडतं फिचर म्हणजे स्टेटस. व्हाट्सअप स्टेटसला WhatsApp Status युजर त्यांचे फोटो, व्हिडीओ किंवा टेक्स तसचं विविध लिंक शेअर करू शकतात.
युजरच्या कॉन्टेक्ट लिस्टमधील सर्वच हे स्टेटस २४ तास पाहू शकतात. २४ तासांनंतर हे स्टेटस डिलीट होतं. आता व्हाट्सअपने हे फिचर WhatsApp Feature अपग्रेड केलं आहे. ज्यामुळे व्हाट्सअपवर शेअर करण्यात आलेलं स्टेटस तुम्ही एकाच वेळी फेसबुक स्टोरी आणि इन्स्टाग्राम स्टोरीवरही शेअर करू शकता.
व्हाट्स्अप प्रमाणेच फेसबुक आणि Instagram वर देखील स्टोरी हा पर्याय आहे. यापूर्वी व्हाट्सअप स्टेटसवर फोटो किंवा व्हिडीओ शेअर केल्यानंतर जर तुम्हाला तेच फोटो इन्स्टाग्रामला शेअर करायचे असतील.
तर इन्स्टाग्रामवर जाऊन ते स्टोरीमध्ये ठेवावे लागतं. इन्स्टाग्रामवरील स्टोरी किंवा पोस्ट फेसबुकवर शेअऱ करण्याची सोय होती. मात्र आता एकाच वेळी तुम्हाला व्हाट्सअप, इन्स्ट्राग्राम आणि फेसबुकवर स्टोरी किंवा स्टेटस शेअर करणं शक्य आहे.
अनेकांना या नव्या फिचरची कल्पना असली तरी ते फिचर कसं वापरावं . कशा प्रकारे एकाचवेळी व्हाट्सअप स्टेटस फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर करावं हे माहित नसेल. तर आम्ही तुम्हाला यासाठी असणाऱ्या स्टेप्स सांगणार आहोत.
हे देखिल वाचा-
असं शेअर करा WhatsApp स्टेटस फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर
व्हाट्सअप ओपन करून त्यातील स्टेटस पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर कॅमेराच्या चिन्हावर क्लिक केल्यावरर तुमच्या मोबाईलची गॅलरी ओपन होईल. यातील तुम्हाला हवे असलेले फोटो किंवा व्हिडीओ निवडा.
स्टेटसला तुम्ही हवं असलेलं कॅप्शन देऊ शकता. अशा प्रकारे तुमचं WhatsAppचं स्टेटस अपडेट होईल.
आता हेच फोटो किंवा व्हिडीओ फेसबुक तसचं इन्स्टाग्रामवर शेअर करण्यासाठी स्टेटस शेजारी असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा.
इथं तुम्हाला फक्त फेसबुक स्टोरी ठेवायची असल्यास Share To Facebook या पर्यायावर क्लिक करा. त्यानंतर Share Now चा पर्याय निवडल्यावर हे फोटो किंवा व्हिडीओ थेट फेसबुक स्टोरीला शेअर होतील.
तर यातील दुसऱ्या पर्यायात स्टेटस शेजारी असलेल्या ३ डॉटवर क्लिक करा. यात Share हा पर्याय दिसेल. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अनेक पर्याय उपलब्ध होतील.
यात तुम्ही इन्स्टाग्राम रील, इन्स्टाग्राम स्टोरी, इन्स्टाग्राम या इन्स्टाग्रामच्या पर्यांयापैकी कोणताही निवडू शकता.
तसचं फेसबुक प्रोफाईल फोटो आणि फेसबुक स्टोरी असे फेसबुकसाठी पर्याय उपलब्ध होतील.
व्हाट्सअप वरील स्टेटस फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर शेअर करताना तुम्हाला ते कोणासोबत शेअर करायचे आहेत. म्हणजेच फक्त फ्रेंडलिस्ट साठी की सर्व युजर्ससाठी हे विचारण्यात येईल.
अशा प्रकारे आता तुम्ही WhatsApp स्टेटस ठेवल्यानंतर हेच स्टेटस किंवा स्टेटसमधील फोटो किंवा व्हिडीओ WhatsApp वरुन शेअर करू शकता. व्हाट्सअपचं हे नवं फिचर खुपच सोपं आणि सुंदर आहे,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.