World Toilet Day : ऐनवेळी शोधायचंय जवळचं टॉयलेट? 'हे' अ‍ॅप करेल मदत.. जाणून घ्या कसं

लोकांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबद्दल जागरुकता निर्माण व्हावी, आणि त्यांनी यादृष्टीने प्रयत्न करावे यासाठी टॉयलेट दिन साजरा केला जातो.
World Toilet Day
World Toilet DayeSakal
Updated on

19 नोव्हेंबर हा दिवस जागतिक टॉयलेट दिन म्हणून साजरा केला जातो. याची सुरुवात 2001 सालीच करण्यात आली होती. मात्र, संयुक्त राष्ट्रांनी 2023 साली याला अधिकृत मान्यता दिली. लोकांमध्ये वैयक्तिक स्वच्छतेबद्दल जागरुकता निर्माण व्हावी, आणि त्यांनी यादृष्टीने प्रयत्न करावे यासाठी हा दिवस साजरा केला जातो.

भारतातील कित्येक नागरिक अजूनही उघड्यावर शौचाला जातात. उघड्यावर लघवी करण्याचं प्रमाण तर त्याहून अधिक आहे. याला कारण म्हणजे, स्वच्छ शौचालय कुठे आहेत हेच माहिती नसणे, किंवा ऐनवेळी स्वच्छ शौचालय शोधता न येणे. यावरच उपाय म्हणून 'Toilet Seva' हे अ‍ॅप विकसित करण्यात आले आहे.

काय आहे टॉयलेट सेवा?

टॉयलेट सेवा या अ‍ॅपवर पुणे शहरातील जवळपास दोन ते अडीच हजार शौचालयांची माहिती आहे. यामध्ये पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पुणे जिल्हा परिषद अशा सरकारी शौचालयांचा समावेश आहे. सोबतच पुण्यातील कित्येक खासगी टॉयलेट्स देखील या अ‍ॅपवर रजिस्टर आहेत.

यामुळे शहरात फिरत असताना तुम्हाला केवळ एका क्लिकवर तुमच्या सर्वात जवळ कोणतं टॉयलेट उपलब्ध आहे याची माहिती मिळू शकणार आहे. अमोल भिंगे या मराठी व्यक्तीने या अ‍ॅपची निर्मिती केली आहे. अमोल हे अमेरिकेत असतात. त्यांच्या नावावर आठ यूएस पेटंट आहेत.

World Toilet Day
Constipation Home Remedies : कमोडवर बसल्यानेच होते बद्धकोष्ठता? उगीच नाही आपलं Indian Toilet भारी!

काय आहे खास?

जून 2022 साली हे अ‍ॅप लाँच करण्यात आलं होतं. यामध्ये यूजर्सना केवळ टॉयलेटच नाही, तर तिथे उपलब्ध असणाऱ्या फॅसिलिटींची देखील माहिती देण्यात येते. यासोबतच एखादे टॉयलेट सुस्थितीत नसेल, तर त्याबाबत फीडबॅक देण्याची सुविधा देखील देण्यात आली आहे. हे अ‍ॅप इंग्लिश, हिंदी, मराठी अशा तीन भाषांमध्ये उपलब्ध आहे.

या अ‍ॅपमध्ये असणाऱ्या खासगी प्रोव्हाईडर्समध्ये हॉटेल, मॉल्स, पेट्रोल पंप, बँक, शाळा-महाविद्यालये, कॉर्परेट ऑफिस, थिएटर्स, इव्हेंट सेंटर यांची माहिती दिली आहे. तर सार्वजनिक टॉयलेटमध्ये सुलभ शौचालय, ती टॉयलेट, ई-टॉयलेट, बस स्टँड, ट्रेन स्टेशन, मेट्रो स्टेशन, विमानतळे यांची माहिती दिली आहे.

World Toilet Day
Mobile In Toilet : तुम्हीही टॉयलेटमधे मोबाईल वापरता का? त्याचे गंभीर परिणाम वाचून उडेल झोप

यामध्ये तुम्ही ठराविक फिल्टरने देखील टॉयलेट शोधू शकता. यामध्ये मोफत शौचालये, 15 रुपयांपेक्षा कमी चार्जेस असणारी शौचालये, 50 रुपयांपर्यंत चार्जेस असणारी शौचालये, प्रीमियम शौचालये, केवळ विद्यार्थ्यांसाठी, केवळ कर्मचाऱ्यांसाठी, केवळ ग्राहकांसाठी असे फिल्टर देण्यात आले आहेत.

हे अ‍ॅप प्ले-स्टोअरवर मोफत उपलब्ध आहे. याठिकाणी टॉयलेट्सना रेटिंग देखील दिले आहेत, ज्यामुळे यूजर्स अधिक चांगले रेटिंग असणारे टॉयलेट निवडू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.