Top 10 Hatchback Cars : नोव्हेंबरमध्ये सर्वाधिक विक्री झालेल्या 10 हॅचबॅक कार

हॅचबॅक कार (Hatchback Cars) हा भारतीय कार बाजारपेठेतील एक लोकप्रिय विभाग आहे. या विभागातील कारची देशात चांगल्या प्रकारे विक्री होते.
best selling Hatchback Cars in India
best selling Hatchback Cars in Indiaesakal
Updated on

Best selling hatchback cars in India in November 2021)-

अलीकडे भारतीयांचा कार खरेदीकडे (Indians interested in car) कल वाढत आहे. त्यातही हॅचबॅक (Hatchback) कार घेणं भारतीय जास्त पसंद करतात. हॅचबॅक कार हा भारतीय कार बाजारपेठेतील (Indian Car Market) एक लोकप्रिय विभाग आहे. या विभागातील कारची देशात चांगल्या प्रकारे विक्री होते. आज आपण नोव्हेंबर 2021 मध्ये विकल्या गेलेल्या टॉप 10 हॅचबॅक कारची (Top 10 Hatchback Cars) आपण माहिती घेणार आहोत. (Top 10 selling hatchback cars in India of the month in November 2021)

1. मारुती वॅगनआर (Maruti WagonR)-

नोव्हेंबर 2021 मध्ये देशात विकल्या गेलेल्या टॉप 10 हॅचबॅकच्या यादीमध्ये मारुती वॅगनआर ही कार क्रमांक एकला राहिली. गेल्या वर्षीच्या तुलनेत मारुती वॅगनआरची विक्री सकारात्मक राहिली. 3.6 टक्क्यांच्या वार्षिक वाढीसह नोव्हेंबर 2021 मध्ये WagonR च्या विक्री 16,853 युनिट्सची विक्री झाली, नोव्हेंबर 2020 मध्ये 16,256 युनिट्सची विक्री झाली होती.

best selling Hatchback Cars in India
ऑडीची नवीन आलीशान A4 प्रीमियम कार लाँच; पाहा व्हिडिओ

2. मारुती सुझुकी स्विफ्ट (Maruti Suzuki Swift)-

गेल्या महिन्यात मारुती सुझुकी स्विफ्ट या कॉम्पॅक्ट हॅचबॅकची विक्री 21 टक्क्यांनी घसरून 14,568 युनिट्सवर आली आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात 18,498 युनिट्सची विक्री झाली होती. स्विफ्ट बाजारात येऊन 15 वर्षे झाली आहेत. 2021 च्या सुरुवातीला नवीन रंग पर्याय आणि काही नवीन वैशिष्ट्यांसह ही कार बाजारात दाखल झाली होती.

3. मारुती अल्टो (Maruti Alto)-

मारुती अल्टो ही एंट्री-लेव्हल हॅचबॅक गेल्या महिन्यात 13,812 युनिट्ससह तिसऱ्या क्रमांकावर राहिली. नोव्हेंबर 2020 मध्ये विक्री झालेल्या 15,321 युनिट्सच्या तुलनेत 9.8 टक्क्यांनी घट झाली आहे. नवीन पिढीची अल्टो देखील पुढील वर्षाच्या अखेरीस लॉन्च होण्याच्या तयारीत आहे.

4. मारुती बलेनो (Maruti Baleno)-

मारुती बलेनो प्रीमियम हॅचबॅक (Premium hatchback) चौथ्या क्रमांकावर होती, तिच्याही विक्रीत घट झाली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये त्याची 17,872 युनिट्सची विक्री होती, तर गेल्या महिन्यात ती 9,931 युनिट्सवर घसरली. अल्टो प्रमाणेच, बलेनो देखील पुढील वर्षी नवीन अपडेट मिळविण्यासाठी सज्ज आहे.

best selling Hatchback Cars in India
किआची सेव्हन सिटर 'केरेन्स' कार भारतात होणार लाँच

5. टाटा पंच (Tata Punch)-

बलेनोनंतर टाटा पंच 5 व्या क्रमांकावर आहे. टाटाचीही नवी कार मारूतीशी स्पर्धा करत आहे. टाटा पंचची नोव्हेंबरमध्ये 6,110 युनिट्स विकली गेली. यामुळे अल्ट्रोझ नोव्हेंबर २०२१ च्या टॉप १० हॅचबॅक यादीतून बाहेर गेली.

6. मारूती सुझुकी सेलेरियो (Maruti Suzuki Celerio)-

मारुती सुझुकीची सेलेरियो ही कार गेल्या महिन्यात विक्री झालेल्या कारच्या यादीत सहाव्या क्रमांकावर राहिली. तिची किंमत 4.99 लाख ते रु. 6.94 लाख (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे.

7. ह्युंडाई ग्रॅड i10 (Hyundai Grand i10)-

Hyundai Grand i10 सातव्या क्रमांकावर आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये विक्री झालेल्या 14,003 युनिटच्या तुलनेत नोव्हेंबर 2021 मध्ये विक्री 60 टक्क्यांनी घसरून 5,486 युनिट्सवर आली.

8. टाटा टियागो (Tata Tiago)-

टाटा टियागो, 4 स्टार रेटेड हॅचबॅक आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये टियागोच्या 5,890 युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत 4,998 युनिट्सच विकली गेली. या विक्रीसह ती 7 व्या क्रमांकावर आहे.

best selling Hatchback Cars in India
झूम ; छोटी कार, मोठा ‘पंच’!

9. ह्युंडाई i 20 (Hyundai i20)-

नोव्हेंबर 2020 मध्ये गेल्या महिन्यात 9,096 युनिट्सच्या विक्रीच्या तुलनेत नोव्हेंबर 2021 मध्ये 51.7 टक्क्यांनी घटून 4,391 युनिट्सवर Hyundai i20 नवव्या क्रमांकावर आहे.

10. मारुती एस-प्रेसो (Maruti S-Preso)-

मारुती S-Presso ची विक्री 44.9 टक्क्यांनी घसरली असून टॉप 10 मध्ये ती दहाव्या क्रमांकावर आहे, गेल्या वर्षी याच महिन्यात 7,018 युनिट्सची विक्री झाली होती.

नोव्हेंबर 2021 (November 2021) मध्ये सर्वाधिक विकल्या गेलेल्या हॅचबॅकच्या टॉप 10 यादीमध्ये टाटा अल्ट्रोझने (Tata altroz) स्थान पटकावले आहे. मागील महिन्यात विक्री झालेल्या 3,025 युनिट्ससह ती 11 व्या क्रमांकावर होती, नोव्हेंबर 2020 मध्ये विकल्या गेलेल्या 6,260 युनिटच्या तुलनेत तिची विक्री 51.6 टक्क्यांनी घसरली. (डेटा क्रेडिट रशलेन)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.