Auto Expo 2023: ऑटो एक्स्पोमध्ये इलेक्ट्रिक कार्सचा धुमाकूळ, लाँच झाल्या या टॉप-५ दमदार गाड्या

ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये अनेक शानदार इलेक्ट्रिक कार्स सादर झाल्या आहेत. या कार्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.
Cars
Carsanu97
Updated on

Top EV Unveils at Auto Expo 2023: भारतीय बाजारात इलेक्ट्रिक गाड्यांची लोकप्रियता वाढत चालली आहे. सरकारकडून देखील इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन दिले जात आहे. याच पार्श्वभूमीवर ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये अनेक शानदार इलेक्ट्रिक कार्स सादर झाल्या आहेत. या कार्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Cars
Face Recognition: फक्त चेहरा दाखवा आणि बँकेतून पैसे काढा, खातेधारकांसाठी येणार खास टेक्नोलॉजी

Hyundai Ioniq 5

Auto Expo 2023 मध्ये Hyundai Ioniq 5 ला लाँच करण्यात आले आहे. या इलेक्ट्रिक गाडीची किंमत ४४.९५ लाख रुपये आहे. ही कार इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्यूलर प्लेटफॉर्मवर (E-GMP) आधारित आहे. आकर्षक डिझाइनसह येणाऱ्या कारमध्ये एलईडी हेडलॅम्प आणि टेल लाइट्स, क्लॅमशेल बोनट, ऑटो-फ्लश डोर हँडल, अ‍ॅक्टिव्ह एअरो एलॉय व्हील्स देण्यात आले आहेत.

Tata Harrier EV

Tata ने ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये इलेक्ट्रिक कार Harrier EV ला सादर केले आहे. कंपनीने या इव्हेंटमध्ये तीन कॉन्सेप्ट कारला सादर केले आहे. या इलेक्ट्रिक कारचे डिझाइन खूपच शानदार असून, यात अनेक दमदार फीचर्स मिळतात. Tata Harrier EV यावर्षी भारतीय बाजारात लाँच होईल.

Maruti Suzuki eVX Concept

Maruti Suzuki ने ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये eVX Concept कारला सादर केले आहे. ही कार भारतीय बाजारात टाटा पंच ईव्ही आणि Mahindra eKUV100 ला टक्कर देईल. यात दिलेले शार्प कॅरेक्टर लाइन्स, फ्लॅट फेशिया आणि एलईडी लाइट्सला कारला खास बनवतात.

हेही वाचा: iPhone Offer: आयफोनवर आतापर्यंतची सर्वात मोठी सूट, ३० हजार रुपये स्वस्तात करा खरेदी; पाहा ऑफर

Kia EV9 Concept

Kia EV9 Concept ला पहिल्यांदा ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सादर करण्यात आले आहे. ही इलेक्ट्रिक एसयूव्ही फ्रंट आणि रियरला एलईडी लाइटिंगसह येईल. यात रुफवर सौर पॅनेल, पॉप-अप स्टेअरिंग व्हील आणि २७ इंच टचस्क्रीन डिस्प्ले मिळेल.

Toyota bZ4X

टोयोटाने पहिल्यांदाच ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये पूर्ण इलेक्ट्रिक कार Toyota bZ4X ला शोकेस केले आहे. डिझाइनच्याबाबतीत ही कार खूपच आकर्षक आहे. कारला आधीच चीनमध्ये लाँच करण्यात आले आहे. कारमध्ये कनेक्ट एलईडी हेडलॅम्प्स आणि टेल लाइट्स देण्यात आले आहेत, जे याच्या डिझाइनला आकर्षक बनवतात.

हेही वाचा: पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.