Hide Mobile Apps : मोबाईल अ‍ॅप्स लपवायच्या आहेत? 'या' सोप्या हाईड ट्रिक्स वापरून बघा

Smartphone Tips : लहान मुलांपासून ते चोरांपर्यंत कुणीच शोधू शकणार नाही तुमचे प्रायव्हेट अ‍ॅप्स
5 Ways to Hide Apps on Android
5 Ways to Hide Apps on Androideaskal

Mobile Apps : कधी कधी आपल्या फोनमध्ये अशी अॅप्स असतात जिथे आपली खासगी माहिती असते किंवा ज्या अॅप्स आपण मुलांपासून दूर ठेवायच्या असतात. अशा वेळी त्या अॅप्स लपवणे हा तुमच्या फोनची गोपनीयता राखण्याचा एक उत्तम मार्ग आहे. तुमच्या Android फोनवर अॅप्स लपवण्यासाठी पाच सोपे मार्ग आहेत ते पाहूया.

1. फोनच्या बिल्ट-इन फीचरचा वापर

Samsung, Poco, Realme आणि Xiaomi सारख्या अनेक फोनमध्ये अॅप्स लपवण्यासाठी बिल्ट-इन फीचर असते. या फीचरची जागा वेगवेगळी असू शकते. Samsung मध्ये हे Settings मध्ये मिळते तर Realme, Oppo आणि OnePlus मध्ये Dialer मध्ये मिळते. Xiaomi मध्ये 'Hidden Apps' सर्च करून हे फीचर शोधता येते.

2. अॅपचं नाव आणि आयकॉन बदलणे

जर तुमच्या फोनमध्ये अॅप्स लपवण्यासाठी बिल्ट-इन फीचर नसले तर तुम्ही थर्ड-पार्टी लाँचर्सचा वापर करू शकता. Nova, Apex आणि Microsoft Launcher सारख्या लाँचर्सच्या मदतीने तुम्ही अॅप्स होम स्क्रीन आणि अॅप ड्रॉवरमधून लपवू शकता. त्याचबरोबर अॅप लपवण्याऐवजी त्याचं नाव आणि आयकॉन बदलू शकता.

5 Ways to Hide Apps on Android
Laptop Screen Cleaning : लॅपटॉपची स्क्रिन करा सुरक्षितपणे क्लीन; घरच्या घरी वापरून पाहा 'या' सोप्या स्टेप्स

3. अॅप्स फोल्डरमध्ये हलवा

अॅप लपवण्याचा आणखी एक सोपा मार्ग म्हणजे ते फोल्डरमध्ये हलवणे. अनेक लाँचर्समध्ये अॅप्ससाठी फोल्डर्स बनवण्याची सुविधा असते. जरी हा सर्वात सुरक्षित मार्ग नसला तरी अॅप स्क्रिनवर थोडं कमी दिसण्यासाठी उपयुक्त आहे.

4. थर्ड-पार्टी अॅप्सचा वापर

वरील पर्याय तुमच्या कामी न येत असतील तर तुम्ही Google Play Store वरून थर्ड-पार्टी अॅप्स डाउनलोड करू शकता. या अॅप्सच्या मदतीने fingerprint, पासवर्ड, पॅटर्न किंवा PIN सारख्या सिक्युरिटीच्या आड अॅप्स लपवता येतात.

5 Ways to Hide Apps on Android
GSAT-N2 Satellite : इस्रोचं नवीन सॅटेलाईट प्रक्षेपणासाठी सज्ज; SpaceX करणार लाँच,इंटरनेट कनेक्टिव्हिटीवर होणार परिणाम? जाणून घ्या

5. नवीन युजर प्रोफाइल तयार करणे

Android फोनवर, आपण एकापेक्षा जास्त युजर प्रोफाइल बनवू शकता. यामुळे प्रत्येक युजरसाठी वेगळी सेटिंग्स, अॅप्स आणि डेटा असू शकते. युजर प्रोफाइल बनवण्याचा पर्याय वेगवेगळ्या फोनमध्ये वेगवेगळा असू शकतो. पण Settings मध्ये 'Multiple Users' सर्च करून हा पर्याय शोधण्याचा प्रयत्न करा.

यासर्व सोप्या मार्गांचा अवलंब करून तुम्ही तुमच्या मोबाईलमधील अँप्स सहजपणे लपवू शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com