'वर्किंग वुमन' आहात? मग 'हे' ॲप्स तुमच्या फोनमध्ये असायलाच हवेत

Top Five Mobile Apps for Women
Top Five Mobile Apps for Women
Updated on

Top Five Mobile Apps for Women : सध्याच्या धावपळीच्या आणि तंत्रज्ञानाच्या या युगात, प्रत्येकाच्या गरजांसाठी मोबाइल ॲप्स (Mobile Apps) डिजाइन केले गेले आहेत. हे ॲप्स विशेषत: लहान मुले, तरुण-तरुणी, महिला, पुरुष, वृद्ध आणि इतरांच्या खास गरजा लक्षात घेऊन डिझाइन केले जातात. वापरकर्ते त्यांच्या गरजेनुसार Google Play Store किंवा Apple App Store वरून ते डाउनलोड करू शकतात. मात्र, आज आपण नोकरदार महिलांसाठी (Working Women) उपयोगी असलेल्या टॉप 5 ॲप्सबद्दल जाणून घेणार आहोत. जे प्रत्येक घराबाहेर काम करणार्‍या किंवा व्यावसायिक महिलांचे जीवन सोपे आणि तणावमुक्त ठेवण्यासाठी हे बेस्ट ठरतील.

प्रत्येक महिलेकडे असले पाहिजेत असे टॉप 5 ॲप्स :

खर्च व्यवस्थापन ॲप्स (Expense Managing Apps) : प्रत्येकासाठी त्यांच्या खर्चाचे व्यवस्थापन आणि ट्रॅक ठेवणे खूप महत्वाचे आहे. त्यासाठी Monefy, Expense Manager, Money Manager आणि Spending Tracker यासारखे अनेक ॲप्स ऑनलाइन उपलब्ध आहेत, जे तुमचा महिनाभर झालेला खर्च ट्रॅक करण्यासाठी डाउनलोड केले जाऊ शकतात. हे वापरुन तुम्हाला तुमचे बजेट चांगले मॅनेज करता येईल.

कॅब/बाईक सर्व्हिस प्रोव्हायडर ॲप्स (Cab/Bike Service Provider) : तुमच्या स्मार्टफोनमध्ये अशी ॲप्सडाउनलोड केले पाहिजेत जे कॅब आणि बाइक सर्व्हिस प्रोव्हायड करतात. तुम्ही Uber, Ola आणि Rapido सारखे ॲप्स इन्स्टॉल करून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी वाहन बुक करू शकता. तुम्ही कुठेतरी अडकले असाल आणि घरी पोहोचण्यासाठी दुसरा कोणताही मार्ग नसताना हे ॲप्स विशेषतः उपयोगी पडतात.

Top Five Mobile Apps for Women
फक्त फोन सुरु ठेवायचाय? हे आहेत Jio, Airtel अन् Vi चे बेस्ट प्लॅन्स

सेफ्टी ॲप्लिकेशन (Safety Applications) : नोकरदार महिलांना कधीकधी एकट्याने अज्ञात ठिकाणी प्रवास करावा लागतो किंवा जास्त तास काम करावे लागते. सध्या महिलांवरील गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत महिलांनी आपल्या सुरक्षेची काळजी घेणे गरजेचे आहे. तुम्ही तुमच्या फोनवर bSafe, My SafetyPin आणि Smart 24x7 सारखी मोबाईल ॲप्सडाउनलोड आणि इंस्टॉल करू शकता.

मासिक पाळी ट्रॅकिंग ॲप्स : नोकरी करणाऱ्या महिलांनी मासिक पाळी ट्रॅक करण्यात मदत करण्यासाठी Period Tracker, My Calendar आणि Flo सारखे ॲप्स डाउनलोड करता येतील

Top Five Mobile Apps for Women
ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे पुन्हा ब्लॅक फंगसचा धोका? तज्ञ म्हणतात की..

लिस्टींग आणि रिमांइडर ॲप्स : काहीवेळा तुम्हाला एकाच वेळी अनेक गोष्टीववर काम करावे लागते, अनेक मिटींग्स कराव्या लागतात आणि एकाच वेळी अनेक कामे मॅनेज करावी लागतात. अशा स्थितीत हे सर्व एकाच वेळी करतेवेळी काही कामांमध्ये गडबड होण्याची शक्यता असते. तुमचे काम मॅनेज करण्यासाठी तुम्ही काही उपयोगी ॲप्सडाउनलोड करू शकता. येथे तुम्ही तुमच्या कामाच्या अ‍ॅक्टिव्हिटी ट्रॅक करु शकता. Daily Tasks, To-Do List आणि Reminders सारखे ॲप्स ऑनलाइन उपलब्ध आहेत जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.

Top Five Mobile Apps for Women
Jio Vs Airtel Vs VI : हे आहेत 84 दिवसांचे सर्वात स्वस्त रिचार्ज प्लॅन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.