Top Games in 2023 : हे वर्ष संपण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. नव्या वर्षाची चाहूल लागलेली असतानाच, सरत्या वर्षात काय काय झालं हेदेखील आपण पाहत आहोत. 2023 साली व्हिडिओ गेम क्षेत्रात कोणत्या गेम्सनी सगळ्यात जास्त कमाई केली, आणि कोणत्या गेम्स सर्वाधिक खेळल्या गेल्या याबाबत माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे.
स्टीमने (Steam Top Games) दिलेल्या माहितीचं वैशिष्ट म्हणजे, यामध्ये 'टॉप 10' अशी यादी न देता; प्लॅटिनम, गोल्ड, सिल्व्हर आणि ब्राँझ अशा कॅटेगरी देण्यात आल्या आहेत. यातील प्लॅटिनम लिस्टमध्ये टॉप 12 गेम्स आहेत. त्यानंतर पुढील 12 या गोल्ड कॅटेगरीमध्ये, पुढील 26 या सिल्व्हर कॅटेगरीमध्ये आणि शेवटच्या 50 या ब्राँझ कॅटेगरीमध्ये दिल्या आहेत.
1 जानेवारी 2023 ते 15 डिसेंबर 2023 या दरम्यानच्या आकडेवारीनुसार ही यादी तयार करण्यात आली आहे. आयजीएन वेबसाईटने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. (Gaming News)
रेव्हेन्यूच्या बाबतीत यावर्षीच्या टॉप गेम्समध्ये पुढील टायटल्सचा समावेश आहे -
अॅपेक्स लेजंड्स (Apex Legends)
बाल्डर्स गेट 3 (Baldur's Gate 3)
स्टारफील्ड (Starfield)
हॉगवर्ट्स लेगसी (Hogwarts Legacy)
लॉस्ट आर्क (Lost Ark)
सायबरपंक 2077 (Cyberpunk 2077)
डोटा 2 (Dota 2)
पब्जी : बॅटलग्राऊंड्स (PUBG: Battlegrounds)
डेस्टिनी 2 (Destiny 2)
काउंटर स्ट्राईक 2 (Counter-Strike 2)
सन्स ऑफ दि फॉरेस्ट (Sons of the Forest)
कॉल ऑफ ड्यूटी (Call of Duty HQ)
यावर्षीच्या सर्वाधिक खेळलेल्या गेम्सची यादी बनवताना, प्लॅटिनम यादीमध्ये अशा गेम्सचा समावेश करण्यात आला ज्यांना 3 लाखांहून अधिक पीक प्लेयर्स मिळाले. या यादीमध्ये पुढील गेम्सचा समावेश आहे -
गूस गूस डक (Goose Goose Duck)
सन्स ऑफ दि फॉरेस्ट
हॉगवर्ट्स लेगसी
पब्जी बॅटलग्राऊंड्स
काउंटर स्ट्राईक 2
बाल्डर्स गेट 3
डेस्टिनी 2
अॅपेक्स लेजंड्स
डोटा 2
स्टारफील्ड
लॉस्ट आर्क
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.