Google Search Diwali : दिवाळीबाबत जगभरात कुतूहल, 'हे' पाच प्रश्न केले गेले सर्वाधिक सर्च; सुंदर पिचाईंनी शेअर केली यादी

Sundar Pichai : जगभरात दिवाळीबाबत जाणून घेणारे टॉप पाच प्रश्न इथे दिले आहेत.
Google Search Diwali
Google Search DiwalieSakal
Updated on

सध्या दिवाळीचा उत्साह केवळ देशातच नाही, तर जगभरात दिसून येत आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनीही दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यासोबतच त्यांनी दिवाळीच्या काळात जगभरात सर्च करण्यात आलेले टॉप 5 प्रश्न देखील शेअर केले.

पिचाई यांनी एक्सवर (ट्विटर) एक पोस्ट करत ही माहिती दिली आहे. "दिवाळीबाबत जगभरातील लोकांना भरपूर कुतूहल आहे. त्यामुळेच जगभरात दिवाळीबाबत जाणून घेणारे टॉप पाच प्रश्न इथे दिले आहेत." असं पिचाई यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

एका जिफमध्ये हे पाचही प्रश्न शेअर करण्यात आले आहेत. या जिफमध्ये एक पणती देखील दिसत आहे. हे पाच प्रश्न पुढीलप्रमाणे -

  • भारतीय लोक दिवाळी का साजरी करतात?

  • दिवाळीमध्ये रांगोळी का काढली जाते?

  • दिवाळीमध्ये पणत्या का लावल्या जातात?

  • दिवाळीमध्ये लक्ष्मी देवीची पूजा का करतात?

  • दिवाळीमध्ये अभ्यंगस्नान/तेल लाऊन अंघोळ का करतात?

Google Search Diwali
Diwali Pollution: लक्ष्मीपूजनाला फटाक्यांमुळे प्रदूषणाची पातळी 212 टक्के; नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम

एकूणच, दिवाळी सण आणि त्यामधील प्रथा याबाबत जाणून घेण्यासाठी जगभरातील लोक उत्सुक होते. (Tech News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.