Traffic Rules : गाडीच्या बाबतीत आजिबात करु नका 'ही' चूक; जागेलाच होईल २५ हजारांचा दंड!

Traffic News : सध्या पोलिसांनी या नियमाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.
Traffic Rules
Traffic RuleseSakal
Updated on

वाहन चालवताना ट्रॅफिकच्या नियमांचं पालन करणं गरजेचं असतं. मात्र, कित्येक वेळा आपल्याला सगळे नियम माहितीच नसतात. काही लोक तर नियम माहिती असूनही त्यांकडे कानाडोळा करतात. मात्र, असा बेजबाबदारपणा तुम्हाला महागात पडू शकतो.

आपल्या घरी असलेल्या वाहनाच्या बाबतीत एक चूक बरेच लोक करतात. ती म्हणजे अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला देणं. कित्येक वेळा मुलाची वा मुलीची ठराविक उंची झाली, की दुचाकी गाडी चालवण्याची परवानगी घरातून दिली जाते. मात्र, १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या व्यक्तींना गिअरची; तर १६ वर्षांहून लहान मुलांना नॉन-गिअर गाडी चालवण्याची परवानगी नाही.

Traffic Rules
International Driving License : परदेशात गाडी चालवायचीय ? लायसन्स मिळवण्यासाठी अशी आहे प्रक्रिया

दुचाकी आणि चारचाकी दोन्हीसाठी हा नियम लागू होतो. तसंच वयोमर्यादेत बसत असणाऱ्यांनाही केवळ लायसन्स मिळाल्यानंतरच वाहन चालवण्याची परवानगी आहे. कित्येक लोक घरात मदत होईल म्हणून आपल्या लहान मुलांना गाडी शिकवतात, आणि ती त्यांना चालवण्यासही देतात. मात्र यामुळे दुर्घटना होण्याचा धोका वाढतो.

गिअरची दुचाकी, स्कूटर किंवा कार यांपैकी कोणतंही वाहन अल्पवयीन मुलं चालवताना आढळल्यास, पालकांना २५ हजार रुपयांचा दंड होतो. यासोबतच कायद्यानुसार हे वाहन जप्त केलं जातं, आणि या गुन्ह्यासाठी सहा महिन्यांच्या शिक्षेचीही तरतूद आहे.

Traffic Rules
Driving Tips : ड्रायव्हिंग लायसन्स जप्त व्हावं असं वाटत नसेल तर या चुका टाळा!

दिल्लीमध्ये कडक चेकिंग

सध्या दिल्ली पोलिसांनी या नियमाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. अपघातांच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे. शाळा, ट्यूशन क्लासेस आणि सोसायटींजवळ पोलीस तपासणी करत आहेत. अल्पवयीन मुलं गाडी चालवताना आढळल्यास पोलीस त्वरीत त्यांना पकडून, पालकांना दंड ठोठावत आहेत.

तुमच्या शहरात अद्याप कडक चेकिंग सुरू केलं नसलं, तरीही संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी तुम्ही स्वतःच खबरदारी घेणं गरजेचं आहे.

Traffic Rules
Auto-Taxi News: आता भाडं नाकारल्यास रद्द होणार रिक्षा-टॅक्सीचं लायसन्स; पोलिसांनी दिले नवे आदेश!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com