Truecaller Voice Assistant : तुमचे कॉल उचलणारा पर्सनल असिस्टंट आता मोबाईलमध्ये ; ट्रुकॉलरने आणलंय 'हे' नवीन फिचर

Truecaller AI Feature : काही आठवड्यात भारतासह सहा देशांमध्ये मध्ये फिचर लाँच
Truecaller ai-voice assistant feature details
Truecaller ai-voice assistant feature detailsesakal
Updated on

Truecaller : आजकाल प्रत्येक ठिकाणी एआयचा वापर केला जात आहे. टेक कंपन्यांमध्ये तर आपल्या प्रॉडक्टमध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरण्याची स्पर्धाच लागली आहे.या स्पर्धेमध्ये ट्रुकॉलर देखील उतरलं होत.आता ट्रुकॉलरने आणखी एक नवीन स्वयंचलित एआय आधारित फिचर लाँच केलंय. हे फिचर तुमच्या कॉलर्सना automatically उत्तर देईल.

कधी कधी स्पॅम कॉलमुळे आपला वेळ वाया जातो आणि त्रास होतो. पण आता ही समस्या दूर होणार आहे. या नवीन फीचरमध्ये तुमच्याच आवाजात AI टेक्नॉलॉजी कॉलना उत्तर देऊ शकेल.

हे शक्य झालं आहे मायक्रोसॉफ्टच्या 'पर्सनल व्हॉइस' टेक्नॉलॉजीच्या सहकार्यामुळे. हे फीचर फक्त पेड युजर्सनाच उपलब्ध असेल. ते तुमचा आवाज कॉपी करून कॉल घेऊ शकेल, उत्तर देऊ शकेल आणि कॉल करणाऱ्या व्यक्तीला शुभेच्छा देऊ शकेल. इतकेच नाही तर तुमच्या आवाजात सिस्टमद्वारे जनरेटेड कॉल पर्यायही उपलब्ध करून देईल.

Truecaller ai-voice assistant feature details
Whatsapp Colour Feature : गुलाबी,निळा की जांभळा ? रंगीत होणार व्हॉट्‌सॲपचं चॅट.. लवकरच येतोय नवीन फीचर

ट्रूकॉलरचा AI असिस्टंट 2022 मध्ये लाँच झाला होता. स्पॅम कॉल ओळखणे, मेसेज घेणे, तुमच्या वतीने उत्तर देणे आणि कॉल रेकॉर्ड करणे अशी अनेक कामं तो करतो.

तुमच्या आवाजात कॉल उत्तर देण्यासाठी तुम्हाला एक छोटीशी स्क्रिप्ट रेकॉर्ड करावी लागेल आणि नंतर तुमच्या आवाजाची प्रतिकृती तयार करण्यासाठी अॅपला परवानगी द्यावी लागेल. एकदा सेटअप झाल्यानंतर, रेकॉर्ड केलेला आवाज AI कॉलना उत्तर देण्यासाठी वापरेल.

Truecaller ai-voice assistant feature details
Electric Scooter Fire : इलेक्ट्रिक स्कूटर वापरताय? गमवावा लागू शकतो जीव ; जाणून घ्या काय आहे प्रकरण

कॉलचा आवाज खरा आहे की कृत्रिम हे ओळखण्यासाठी, ट्रूकॉलर मायक्रोसॉफ्टच्या 'पर्सनल व्हॉइस' मध्ये एक विशेष वॉटरमार्क वापरते. सध्या ही सेवा फक्त नोंदणी करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी उपलब्ध आहे.

पुढच्या काही आठवड्यांत काही आठवड्यात अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, भारत, स्वीडन आणि चिली सारख्या देशांमध्ये ट्रूकॉलर हा AI व्हॉइस असिस्टंट लाँच करणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.