TVS ने लाँच केली नवीन ज्युपिटर क्लासिक स्कूटर, जाणून घ्या किंमत-फीचर्स

tvs jupiter classic launched in india check price features specifications here
tvs jupiter classic launched in india check price features specifications here
Updated on

TVS Jupiter Classic : TVS मोटर कंपनी (TVS Motor Company) ने आपल्या लोकप्रिय स्कूटर ज्युपिटर (ज्युपिटर) चे नवीन व्हेरिएंट लॉन्च केले आहेत. याचे नाव ज्युपिटर क्लासिक असे आहे आणि ही नवीन टॉप-स्पेक आवृत्ती आहे. TVS Jupiter Classicची एक्स-शोरूम किंमत 85,866 रुपये आहे. कंपनीने 50 लाख वाहने रस्त्यावर उतरवल्याचा आनंद साजरा करण्यासाठी TVS ने ज्युपिटर क्लासिक लॉन्च केली आहे.

नवीन काय असेल?

कंपनीने ज्युपिटर क्लासिकमध्ये काही कॉस्मेटिक बदल केले आहेत. कॉस्मेटिक बदलांमध्ये फेंडर गार्निश, 3D लोगो आणि मिरर हायलाइटसाठी ब्लॅक थीमचा समावेश केला आहे. याला नवीन व्हिझर आणि हँडलबार देखील मिळतात. यात डायमंड-कट अलॉय व्हील्स दिले आहेत आणि आतील पॅनल्स गडद राखाडी रंगात दिले जातील. सीट्स प्रीमियम स्यूडे लेदरेटच्या बनलेल्या आहेत आणि मागील सीटला सपोर्टसाठी बॅकरेस्ट देखील मिळते.

इंजिन आणि कलर ऑप्शन्स

मेकॅनिकली या स्कूटरमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाहीत . यामध्ये तेच 109.7 cc, सिंगल-सिलेंडर फ्युल इंजेक्शन इंजिन मिळवते. हे इंजिन 7.47 PS ची कमाल पॉवर आणि 8.4 Nm चा पीक टॉर्क जनरेट करते. डेकल्स आणि डायल आर्ट्स अपडेट केले गेले आहेत आणि ज्युपिटर क्लासिक दोन कलर पर्यायांमध्ये ऑफर केले आहे - मिस्टिक ग्रे आणि रीगल पर्पल.

tvs jupiter classic launched in india check price features specifications here
Bike Tips : Two Wheeler चावीसोबत येणारी छोटी अल्युमिनियम चीप जपून ठेवा, नाहीतर...

फीचर्स

यामध्ये देण्यात आलेल्या फीचर्सबद्दल बोलायचे झाल्यास , एक ऑल-इन-वन लॉक, इंजिन किल स्विच उपलब्ध आहे. तसेच मोबाईल चार्ज करण्यासाठी यात USB चार्जर दिले आहे. इन्स्ट्रुमेंट क्लस्टर स्कूटर इको मोडमध्ये किंवा पॉवर मोडमध्ये चालत आहे की नाही हे देखील दाखवते. ज्युपिटर क्लासिकला एलईडी हेडलॅम्प, साइड स्टँड इंडिकेटर, इलेक्ट्रिक स्टार्टर, लो फ्यूल वॉर्निंग, फ्रंट युटिलिटी बॉक्स, 21 लीटर बूट स्पेस, रिट्रॅक्टेबल हुक बॅग आणि एक्सटर्नल फ्यूल फिलर देखील मिळते.

ज्युपिटर क्लासिकला ब्रेकिंगसाठी पुढील आणि मागील बाजूस डिस्क ब्रेक मिळतात. यात ट्यूबलेस टायरही आहेत. सस्पेंशनसाठी, समोरच्या बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूस गॅस-चार्ज शॉक एब्जॉर्बर दिले आहेच, ज्यांना 3-स्टेप्स एडजेस्टमेंट्स देण्यात आली आहे.

TVS ज्युपिटर भारतीय बाजारपेठेत Honda Activa, Hero Pleasure Plus आणि Hero Maestro Edge 110 शी स्पर्धा करते.

tvs jupiter classic launched in india check price features specifications here
OnePlus Nord Watch : येतेय वनप्लसची परवडणारी स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.