Twitter Vs Threads : ट्विटरपेक्षा कसं वेगळं आहे थ्रेड्स? जाणून घ्या काय आहे फरक

आपल्याच अ‍ॅपची कॉपी केल्याचा आरोप ट्विटरने मेटावर केला आहे.
Twitter Vs Threads
Twitter Vs ThreadseSakal
Updated on

ट्विटरला टक्कर देण्यासाठी गुरुवारी इन्स्टाग्रामने थ्रेड्स अ‍ॅप लाँच केलं आहे. यामुळे ट्विटरने आपल्याच अ‍ॅपची कॉपी केल्याचा आरोप करत मेटाला कोर्टात खेचण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र, इन्स्टाग्रामचं हे नवीन अ‍ॅप ट्विटरपेक्षा बऱ्याच बाबतीत वेगळं आहे.

थ्रेड्स अ‍ॅपवर ट्विटर प्रमाणेच थोड्या शब्दांमध्ये पोस्ट टाकता येणार आहेत. तसेच, इतरांना फॉलो करणे, पोस्ट लाईक करणे, कमेंट करणे अशा अनेक गोष्टी ट्विटरप्रमाणेच आहेत. मात्र, तरीही या दोन्ही अ‍ॅपमध्ये भरपूर गोष्टी वेगवेगळ्या आहेत.

Twitter Vs Threads
Threads App Glitch : पहिल्याच दिवशी थ्रेड्स अ‍ॅपमध्ये ग्लिच! यूजर्सनी पुन्हा धरली ट्विटरची वाट; शेअर केले स्क्रीनशॉट

कॅरेक्टर लिमिट

ट्विटर आणि थ्रेड्स या दोन्ही अ‍ॅपवर पोस्ट करताना कॅरेक्टर लिमिट लावण्यात आलं आहे. थ्रेड्स आपल्या सर्व यूजर्सना ५०० कॅरेक्टरचं लिमिट देतं. तर, अनव्हेरिफाईड ट्विटर यूजर्स २८० कॅरेक्टर असणाऱ्या पोस्ट करू शकता. ट्विटरवर व्हेरिफाईड यूजर्स २५,००० कॅरेक्टर्स असणाऱ्या पोस्ट करू शकतात.

ड्राफ्ट सेव्हिंग

तुम्ही लिहून ठेवलेल्या पोस्टचा ड्राफ्ट सेव्ह करण्याची सुविधा ट्विटरवर आहे. मात्र, थ्रेड्स अ‍ॅपवर अद्याप अशी कोणतीही सुविधा देण्यात आली नाही.

इन्स्टाग्राम अकाउंट

ट्विटर अ‍ॅपवर प्रोफाईल तयार करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असणं बंधनकारक नाही. मात्र, थ्रेड्स अ‍ॅप वापरण्यासाटी यूजर्सकडे इन्स्टाग्राम अकाउंट असणं बंधनकारक आहे.

व्हिडिओ

थ्रेड्स अ‍ॅपवर यूजर्स पाच मिनिटांपर्यंतचा व्हिडिओ पोस्ट करू शकतात. तर ट्विटरवर अनव्हेरिफाईड यूजर्स २० मिनिटांचा व्हिडिओ अपलोड करू शकतात. ट्विटरवर व्हेरिफाईड यूजर्स तर तब्बल ३ तासांचे व्हिडिओ अपलोड करू शकतात.

Twitter Vs Threads
Meta Threads App : सगळ्यांसोबत थ्रेड्स जॉईन करायचंय? गडबडीत चुकीचं अ‍ॅप डाऊनलोड करू नका, बसेल मोठा फटका

होम पेज

ट्विटरच्या होम पेजवर तुम्हाला काय ट्रेंडिंग आहे, तुमच्या आवडीचे टॉपिक कोणते असू शकतात अशा गोष्टी पहायला मिळतात. थ्रेड्स अ‍ॅपवर मात्र अशी कोणतीही सुविधा अद्याप दिलेली नाही.

जाहिराती

थ्रेड्स अ‍ॅपची एक खास गोष्ट म्हणजे, या अ‍ॅपवर कोणत्याही प्रकारच्या जाहिराती नसणार आहेत. तर दुसरीकडे ट्विटरवर जाहिराती दिसतात. विशेष म्हणजे, सोडून गेलेले जाहिरातदार ट्विटरवर परत आणण्याचा प्रयत्न इलॉन मस्क करत आहेत.

Twitter Vs Threads
Threads Vs Twitter : 'स्पर्धा ठीक आहे, पण चीटिंग नाही..'; थ्रेड्स अ‍ॅपवरून मेटाला कोर्टात खेचणार इलॉन मस्क

मेसेजिंग

थ्रेड्स अ‍ॅपवर अद्याप डिरेक्ट मेसेज, म्हणजेच चॅट इनबॉक्सचा पर्याय देण्यात आलेला नाही. ट्विटरवर मात्र हा पर्याय उपलब्ध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.