Twitter : आता ट्विटर वापरण्यासाठी अकाउंट बनवणं अनिवार्य; इलॉन मस्कचा मोठा निर्णय

आता ट्विटर पाहण्यासाठी तुम्हाला लॉग-इन करणं बंधनकारक असणार आहे.
Twitter Sign Up
Twitter Sign UpeSakal
Updated on

टेस्ला आणि स्पेस एक्स या मोठ्या कंपन्यांचे संस्थापक इलॉन मस्क यांनी विकत घेतल्यापासून ट्विटर कायम चर्चेत राहिलं आहे. आता इलॉन यांनी ट्विटरशी संबंधित आणखी एक मोठी घोषणा केली आहे. आता ट्विटर पाहण्यासाठी तुम्हाला लॉग-इन करणं बंधनकारक असणार आहे. (Twitter Sign Up)

यामुळे आता तुमचं जर ट्विटर अकाउंट नसेल, तर तुम्हाला ट्विटर ब्राऊज करता येणार नाही. डेटा स्क्रॅपिंगमुळे हा कठोर निर्णय घेतला असल्याचे इलॉन मस्क यांनी सांगितलं आहे. (Elon Musk Decision)

Twitter Sign Up
Karnataka HC on Twitter : मोदी सरकार विरोधात जाणं ट्विटरला भोवलं; हायकोर्टाने ठोठावला ५० लाखांचा दंड

तात्पुरती उपाययोजना

इलॉन मस्क म्हणाले, की "आमच्या डेटाची एवढ्या मोठ्या प्रमाणात लूट होत होती, की सामान्य यूजर्ससाठी ही अत्यंत मानहानीकारक सेवा होती. एआयचं काम करणाऱ्या जवळपास सर्व कंपन्या, स्टार्टअप आणि मोठमोठ्या संस्था देखील मोठ्या प्रमाणात डेटा स्क्रॅप करत होत्या. यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे."

ट्विटरचा डेटा चोरून आपल्या एआय चॅटबॉटना ट्रेन करणाऱ्या या कंपन्यांविरोधात आपण कोर्टातही जाणार असल्याचं इलॉन म्हणाले. येत्या दोन ते तीन वर्षांमध्ये ही कारवाई करण्यात येणार असल्याचं म्हटलं जातंय. यासंबंधी मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांना मस्क यांच्या वकीलाने पत्रही लिहिल्याचं सांगण्यात येतंय.

Twitter Sign Up
Twitter Ads : इलॉन मस्कचं ट्विटर यूजर्सना गिफ्ट! आता जाहिरातींमधून कमावता येणार पैसे

ट्विटरचं होऊ शकतं नुकसान

तज्ज्ञांच्या मते, ट्विटरचा हा निर्णय त्यांच्यावरच उलटू शकतो. कारण, सार्वजनिकरित्या खुलं असल्यामुळे सर्च इंजिन अल्गोरिदम ट्विटरच्या लिंक्सना मोठ्या प्रमाणात रँक करत होते. तसेच, कित्येक न्यूज पोर्टल आणि इतर वेबसाईट ट्विट्सच्या लिंक एम्बेड करत होते. मात्र, आता ट्विटर जर सर्वांसाठी खुलं नाहीये, तर या गोष्टींवर परिणाम होऊ शकतो.

Twitter Sign Up
Twitter Bug : डिलीट केलेले जुने ट्विट पुन्हा येतायत समोर; नवीन बगमुळे यूजर्स चिंतेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.