विविध प्रकारचे निर्बंध, अन् थ्रेड्स सारख्या प्रतिस्पर्धी अॅप्समुळे अनेक यूजर्स ट्विटरला रामराम ठोकत आहेत. ही गळती रोखण्यासाठी इलॉन मस्क ट्विटर यूजर्ससाठी नवनवीन फीचर्स उपलब्ध करून देत आहे. काही दिवसांपूर्वीच मस्कने ट्विटर अॅड रेव्हेन्यू प्रोग्राम सुरू केला होता. यानंतर आता आणखी एक फीचर ट्विटरने लाँच केलं आहे.
या फीचरच्या माध्यमातून व्हेरिफाईड ऑर्गनायझेशन ट्विटरवर जॉब लिस्टिंग पोस्ट करू शकणार आहेत. हे फीचर ट्विटरचं सबस्क्रिप्शन घेतलेल्या कंपन्यांना मोफत मिळणार आहे. याचा फायदा केवळ कंपन्यांनाच नाही, तर नोकरीच्या शोधात असणाऱ्या लोकांनाही होणार आहे. यामुळे ट्विटर आता थेट लिंक्ड-इनला टक्कर देणार असल्याची चर्चा सुरू आहे. (Twitter new feature)
ट्विटरकडून अद्याप या फीचरची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, कित्येक कंपन्यांनी याचा वापर सुरू केला आहे. ट्विटरने या फीचरसाठी ट्विटर हायरिंग नावाने एक अधिकृत अकाउंटही बनवलं आहे. मात्र, यावरुन अद्याप कोणतीही माहिती देण्यात आली नाही.
असं आहे फीचर
या फीचरच्या माध्यमातून कंपन्या आपल्या बायोमध्ये जॉब पोस्टिंगची लिंक पोस्ट करू शकणार आहेत. एका ट्विटर यूजरने या फीचरची माहिती देणारा स्क्रीनशॉट पोस्ट केला आहे. कंपन्या आपल्या प्रोफाईलवर जास्तीत जास्त पाच जॉब पोस्टिंग देऊ शकणार आहेत. अद्याप हे फीचर भारतात उपलब्ध नाही. मात्र, कित्येक देशांमध्ये हे उपलब्ध करण्यात आलं आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.